भोजपुर, 28 सप्टेंबर : पुरुषांच्या बरोबरीने आता महिलांनी सर्वच क्षेत्रांमध्ये भरारी घेतली आहे. शिक्षण, समाजसेवा, कृषी, क्रीडा असो किंवा मग प्रशासन असो. सर्वच क्षेत्रांमध्ये महिला नाव कमावत आहेत. प्रत्येक क्षेत्रात पुरुषांसोबत महिला प्रगती करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि काळाच्या मागणीनुसार शेती क्षेत्रातही महिला या नवीन इतिहास रचत आहेत. आज अशाच एका यशस्वी महिलेची कहाणी ऐकूयात.
advertisement
बिहारच्या आरा जिल्ह्यातील एका महिलेची ही कहाणी आहे. विद्या रानी सिंह असे या महिलेचे नाव आहे. त्या भरड धान्याची प्रामुख्याने लागवड केली जाते. यासोबतच पारंपरिक भात, मका व इतर पिके घेऊन विद्या राणी या वर्षाला सात ते आठ लाख रुपयांचा नफा कमावत आहे. असा दावा केला जातो की, त्या बिहारमधील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या महिला शेतकरी आहेत.
शेतीच्या माध्यमातून त्या आपले आयुष्य जगत आहेत. सोबत गावातील इतर महिलांनाही सोबत घेऊन त्यांनाही आत्मनिर्भर होण्यासाठी मदत करत आहे. पण त्यांचा हा प्रवास इतका सोपा नव्हता.
स्वतः ट्रॅक्टरने शेत नांगरतात -
विद्या रानी सिंह या स्वत: ट्रॅक्टरने 5 एकर शेत नांगरतात. शेतीमध्ये आधी भात, गहू, बटाटा आदी पारंपरिक पिके घेतली जात होती. मात्र, आता त्या गेल्या दोन वर्षांपासून भरड धान्याची लागवड करत आहेत. यामध्ये बाजरी, ज्वारी, मका, हरबरा यांचा समावेश आहे. तसेच त्यांनी भात आणि उसाची लागवडही मोठ्या प्रमाणावर झाली आहे.
विद्या रानी सिंह या भोजपुरच्या खेसरहिया गावातील रहिवासी आहेत. चन्द्र प्रकाश सिंह असे त्यांच्या पतीचे नाव आहे. 56 वर्षीय विद्या रानी सिंह यांनी लग्नानंतर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मागील 23 वर्षांपासून त्या शेती करत आहेत. अनेकदा विविध प्रकारच्या संस्थांकडून त्यांना सन्मानितही करण्यात आले आहे. त्यांना दोन मुले आहे. तेसुद्धा विद्या रानी सिंह यांना शेतीमध्ये मदत करतात. त्यांची जिद्द आणि कमाई पाहून गावातील 20-25 महिला आता स्वत: शेती करायला लागल्या आहेत.
सोपा नव्हता प्रवास -
लोकल 18 सोबत बोलताना विद्या रानी सिंह यांनी आपल्या प्रवासाविषयी सांगितले. त्या म्हणाल्या की, ‘सासू-सासरे यांच्या निधनानंतर घरात शेती करणारे कुणी नव्हते. माझे पती वकील आहेत. आपण शेती करणार नाही, असे सांगत त्यांनी शेती करण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर त्यांनी बाजारातून धान्य खरेदी करण्यास सुरुवात केली. मात्र, पैसे गुंतवूनही नीट धान्य मिळत नव्हते. मग आम्ही स्वतः ठरवले की, आपण शेती करू आणि अन्नासाठी धान्य पिकवू. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा वर्ष 2000 मध्ये शेती केली. तेव्हापासून आजपर्यंत 23 वर्ष झाले मी सातत्याने हा व्यवसाय करत आहे’. दरम्यान, विद्या रानी सिंह या महिला सक्षमीकरणाच्या मोठ्या उदाहरण आहेत.