कशी झाली सुरुवात?
शेतकरी संभाजी सलगर यांनी चक्क सोयबीनपासून दूध आणि पनीर तयार करून विकण्यास सुरुवात केली आहे. त्यांचे जेमतेम शिक्षण 10 वी पर्यंतचे झाले आहे. वडिलोपार्जित 9 एकर शेती आहे. ही शेती पावसाच्या भरोश्यावर असल्याने उत्पन्न कमी अधिक प्रमाणात होते. सुशिक्षित बेरोजगार शिबिरातून या व्यवसायाची माहिती त्यांना मिळाली होती. त्या शिबिरातून माहिती घेत सोयबीनपासून दूध आणि पनीर तयार करण्याचा शेतीला जोड म्हणून व्यवसाय सुरु केला.
advertisement
पतीचं निधन पण हार मानली नाही, महिला शेतकरी 15 गुंठे शेतीतून घेतायेत लाखोंचं उत्पन्न, Video
यासाठी त्यांना 12 लाखापर्यंत खर्च आला आहे. एक किलो सोयबीनपासून सहा ते सात लीटर दूध निघते आणि त्या दुधापासून दिड किलो पनीर काढता येते. सोयाबीनपासून बनवलेले दूध 30 रुपये लिटर दराने तर पनीर 160 रूपये किलोने विकतात. सर्व खर्च वजा करून महिना काठी त्यांना 40 हजार रुपये रुपये नफा राहतो. हा जिल्ह्यातील एकमेव प्रयोग आहे, असं संभाजी सलगर यांनी सांगितलं.