TRENDING:

पतीचं निधन पण हार मानली नाही, महिला शेतकरी 15 गुंठे शेतीतून घेतायेत लाखोंचं उत्पन्न, Video

Last Updated:

धाराशिव येथील महिला शेतकरी प्रियांका बोडके 15 गुंठे मिरची शेतीतून एक लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
धाराशिव, 11 नोव्हेंबर: अलिकडे पारंपरिक शेतीला फाटा देत अनेक शेतकरी आधुनिक शेतीकडे वळत आहेत. यात महिला शेतकरीही आघाडीवर आहेत. धाराशिव जिल्ह्यातील जांबच्या शेतकरी प्रियांका अजिनाथ बोडके यांनी पती निधनानंतरही हार मानली नाही. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती सुरूच ठेवली. आता 15 गुंठे मिरचीच्या शेतीतून त्यांनी एक लाखाचं उत्पन्न घेतलं आहे. त्यांचा हा प्रवास अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
advertisement

भूम तालुक्यातील जांब येथील प्रियांका बोडके यांचे पती अजिनाथ बोडके यांचं अकाली निधन झालं. पण शेतकरी कुटुंबातील प्रियांका यांनी हार मानली नाही. कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत आधुनिक पद्धतीनं शेती सुरू केली. पॉलिहाऊस मध्ये मल्चिंग पेपरवर आणि ठिबक सिंचनाच्या सहाय्याने 15 गुंठे मिरचीची लागवड केली. आता याच शेतीतून त्या लाखोंची कमाई करत आहेत. यासाठी त्यांना भाऊ आणि सासूचं सहकार्य मिळतंय.

advertisement

दोन शेतकरी भावांचा कमाल, एकत्र केलं काम, महिन्याला सव्वा लाखांची कमाई

मिरची शेतीतून लाखोंची कमाई

प्रियांका यांनी सेंद्रिय पद्धतीने मिरचीचे उत्पन्न घेतले. शेडनेटमध्ये मिरचीची लागवड केल्याने फवारणीचा खर्च कमी होतो. त्यामुळे त्यांना फक्त 20 ते 25 हजार रुपयांचा खर्च आलाय. तर कमीत कमी पाण्यात भरघोस उत्पन्न मिळतेय. मिरचीला बाजारात 40 रुपये किलोहून अधिकचा दर मिळतोय. त्यामुळे त्यांना एक लाख रुपयांचे उत्पन्न झाल्याचेही प्रियांका यांनी सांगितले.

advertisement

शेतीतील बदल स्वीकारावेत

या अगोदर प्रियंकांनी ढोबळी मिरचीची लागवड केली होती. परंतु त्यातून त्यांना फारसे उत्पन्न मिळाले नव्हते. तरीही त्यांनी हार न मानता हिरव्या मिरचीची लागवड केली आणि त्यांना चांगला नफा मिळाला आहे. यासाठी त्यांनी कृषी विभागाच्या योजनेतू शेडनेट हाऊस साठी मदत घेतली. शेडनेट हाऊस उभारून त्यामध्ये त्या यशस्वी शेती करतात. ठिबक सिंचन, मल्चिंग पेपर आणि पॉलिहाऊस यामुळे कमीत कमी पाण्यात, कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी फवारणीत जास्तीत जास्त उत्पन्न घेता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीत नवनवीन बदल करायला हवेत, असेही प्रियंका बोडके सांगतात.

advertisement

मराठी बातम्या/मनी/कृषी/
पतीचं निधन पण हार मानली नाही, महिला शेतकरी 15 गुंठे शेतीतून घेतायेत लाखोंचं उत्पन्न, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल