TRENDING:

5 एकरात 9 ते 10 लाखांची कमाई, ड्रॅगन फ्रुटच्या शेतीतून बीडचा शेतकरी, VIDEO

Last Updated:

बीड येथील संजय थेटे हे मागील दीड वर्षांपासून ड्रॅगन फूटच्या माध्यमातून अगदी चांगली कमाई करत आहेत. 5 एकरमध्ये लागवड केलेल्या ड्रॅगन फूटसाठी त्यांना सुरुवातीला 4 ते 5 लाख रुपयांचा खर्च आला होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रशांत पवार, प्रतिनिधी
advertisement

बीड : अनेक शेतकरी हे शेतीच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळवताना दिसत आहेत. आज एका शेतकऱ्याची कहाणी आपण जाणून घेणार आहोत. सद्यस्थिती पाहता ड्रॅगन फ्रुटची पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये अधिक प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. एकदा केलेली पिकांची लागवड पुढील काही वर्षांसाठी टिकवता येते. त्यामुळे या पिकाच्या विक्रीतून शेतकरी अगदी चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवत आहेत.

advertisement

संजय थेटे या तरुण शेतकऱ्यानेही यातून चांगले उत्पन्न कसे कमावते येते, हे सिद्ध करुन दाखवले आहे. बीड येथील संजय थेटे हे मागील दीड वर्षांपासून ड्रॅगन फूटच्या माध्यमातून अगदी चांगली कमाई करत आहेत. 5 एकरमध्ये लागवड केलेल्या ड्रॅगन फूटसाठी त्यांना सुरुवातीला 4 ते 5 लाख रुपयांचा खर्च आला होता.

Solapur News : मित्रानं दिला आंतरपीक घेण्याचा सल्ला, सोलापुरच्या शेतकऱ्यानं 3 महिन्यातंच मिळवलं 80 हजारांचं उत्पन्न, नेमकं काय केलं?, VIDEO

advertisement

खरंतर हा व्यवसाय सुरू करण्यामागे संजय थेटे यांचं आंतरपीक घेण्याचा उद्देश होता. अगदी त्याचप्रमाणे त्यांनी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करून आंतरपिकांचा फायदा देखील घेतला. सद्यस्थिती पाहता ड्रॅगन फूटच्या माध्यमातून संजय थेटे हे अगदी चांगली कमाई करत आहेत. त्यांनी या पिकाला उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत बनवले आहे.

15 महिन्यात एकरी कमावले 11 लाख रुपये, साताऱ्याच्या शेतकऱ्यानं कशाची शेती केली?, VIDEO

advertisement

5 एकर मध्ये लागवड केलेल्या ड्रॅगन पुढच्या माध्यमातून संजय थेटे वर्षाला कमीत कमी 9 ते 10 लाख रुपयांची कमाई करत आहेत. त्यांच्यापासून इतर शेतकरी हे नक्कीच प्रेरणा घेऊ शकतात आणि आपल्या शेतातही चांगले उत्पन्न मिळवू शकतात.

मराठी बातम्या/मनी/कृषी/
5 एकरात 9 ते 10 लाखांची कमाई, ड्रॅगन फ्रुटच्या शेतीतून बीडचा शेतकरी, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल