TRENDING:

मत्स्यशेतीसाठी बेस्ट पर्याय; कमी जागेत भरघोस उत्पन्न मिळवण्यासाठी तज्ज्ञांंनी सुचवलंं तंत्र

Last Updated:

Biofloc fish farming: कमीत कमी जागेत कमी खर्चाात अधिक उत्पन्न देणाऱ्या व्यवसायाच्या शोधात असाल तर तज्ज्ञांनी सुचवलेल्या या नव्या तंत्राने मत्स्यपालन करून पाहा. अनेक महिलांना या तंत्राने रोजगार मिळाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अंजू प्रजापती
News18
News18
advertisement

रामपूर (उत्तर प्रदेश): कमीत कमी जागेत कमी खर्चाात अधिक उत्पन्न देणाऱ्या व्यवसायाच्या शोधात असाल तर तज्ज्ञांनी सुचवलेल्या या नव्या तंत्राने मत्स्यपालन करून पाहा. उत्तर प्रदेशात अनेक महिलांना या तंत्राने रोजगार मिळाला आहे. Biofloc technology द्वारे मत्स्यपालन ही आधुनिक आणि कार्यक्षम पद्धत आहे. विशेषतः हे तंत्रज्ञान ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनवत आहे. हे तंत्रज्ञान पाण्यातील सूक्ष्मजीवांचा वापर करते जे माशांचे उत्सर्जन आणि इतर कचरा पौष्टिक अन्नात रूपांतरित करतात. या तंत्रज्ञानामुळे पाण्याची गुणवत्ता राखता येते. यामुळे माशांच्या वाढीचा वेग वाढतो आणि पारंपरिक पद्धतींच्या तुलनेत उत्पादनात वाढ होते.

advertisement

मत्स्यपालनासाठी उत्तम तंत्र

रामपूरमध्ये महिला या तंत्राचा वापर करून लहान तलाव किंवा कंटेनरमध्ये मत्स्यपालन करत आहेत. त्यामुळे कमी जागेत जास्त उत्पादन शक्य आहे. हे तंत्रज्ञान केवळ महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवत नाही तर त्यांच्या कुटुंबाच्या उत्पन्नातही हातभार लावत आहे. बायोफ्लॉक प्रणालीला कमी खर्च आणि कमी संसाधने लागतात. विशेषतः महिलांसाठी हा एक आकर्षक व्यवसाय पर्याय बनला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: डाळिंबानं मार्केट खाल्लं, रविवारी शेवगा आणि गुळाला किती मिळाला दर?
सर्व पहा

सहाय्यक संचालिका मत्स्यव्यवसाय डॉ. अनिता यांनी सांगितले की, बायोफ्लॉक तंत्रज्ञानामुळे पारंपारिक मत्स्यशेतीपेक्षा जास्त उत्पादन मिळते कारण पाण्याची गुणवत्ता आणि माशांच्या वाढीचा दर सुधारतो. या तंत्रज्ञानामध्ये पाण्याचा पुनर्वापर केला जातो, ज्यामुळे पाण्याचा वापर कमी होतो. ज्या भागात पाणी टंचाई आहे त्यांच्यासाठी हे विशेषतः फायदेशीर आहे. बायोफ्लॉकमध्ये माशांना कमी खर्चात पोषण मिळते. यामध्ये माशांचे मलमूत्र व कचरा पुनर्वापर करून त्याचे अन्नात रूपांतर केले जाते. त्यामुळे बाहेरील अन्नाची गरज कमी होते. मर्यादित जागेचा जास्तीत जास्त वापर करून लहान तलाव किंवा कंटेनरमध्येही मोठ्या प्रमाणात मत्स्यपालन शक्य आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनी/कृषी/
मत्स्यशेतीसाठी बेस्ट पर्याय; कमी जागेत भरघोस उत्पन्न मिळवण्यासाठी तज्ज्ञांंनी सुचवलंं तंत्र
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल