सोलापूर : बेभरवशाचा मान्सून आणि हवामानातील अस्थिरतेमुळे पारंपरिक शेतीचे गणित दरवर्षी बिघडत चालले आहे. यामुळे नापिकीचे संकट ओढवून शेतकऱ्याचे अर्थचक्र कोलमडत आहे. परिणामी, अनेक शेतकरी नैराश्येने ग्रासले आहेत. मात्र, संकटापुढे गुडघे न टेकता धैर्याने आणि मेहनतीच्या जोरावर एका शेतकऱ्याने मिरची, टोमॅटोच्या आंतरपिकातून चांगले उत्पन्न कमावले आहे. जाणून घेऊयात, याचबाबत लोकल18 हा विशेष आढावा.
advertisement
मोहोळ तालुक्यातील तरटगाव येथील शेतकरी सदाशिव विठ्ठल घोडके यांनी उसाच्या शेतामध्ये मिरची आणि टोमॅटो आंतरपीक घेतले आणि तब्बल 80 हजार रुपयांचे उत्पन्न घेतले. सदाशिव घोडके यांनी या माध्यमातून अन्य शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
शेतकरी सदाशिव विठ्ठल घोडके हे आधी मिल गिरणी कामगार म्हणून काम करत होते. मात्र, नंतर त्यांनी शेती करत आपल्या शेतात ऊस, मका, टोमॅटो, मिरची अशा अनेक प्रकारचे पिके ते घेत आहेत. त्यांनी आंतरपीक म्हणून ऊसाच्या शेतात टोमॅटे, मिरची आणि झेंडू फुलाची लागवड केली आहे. या पिकातून दोन पैसे मिळावे आणि ऊसाला खत म्हणून उपयोग व्हावा म्हणून त्यांनी हे आंतरपीक घेतले आहे.
15 महिन्यात एकरी कमावले 11 लाख रुपये, साताऱ्याच्या शेतकऱ्यानं कशाची शेती केली?, VIDEO
मागील 4 ते 5 वर्षापासुन सदाशिव घोडके हे आंतरपीक घेत आहेत. त्यांच्या एका मित्राने सुचवले की ऊसाच्या शेतात काहीतरी आंतरपीक घ्यायला हवे. आंतरपीक घेतल्याने ऊसाला लागणारा खर्च यामधुन निघतो. तसेच चलनसाठी पैसेही मिळतील. त्यामुळे मित्राच्या सल्ल्यावरुन त्यांनी आंतरपीक घ्यायला सुरुवात केली.
Dharashiv News : 4 वेळा बंद पडला व्यवसाय, पण जिद्द ना सोडली! आज महिन्याला 70 हजारांची उलाढाल, VIDEO
टोमॅटो 2 ते 3 महिन्यांत मार्केटमध्ये जाते. जर टोमॅटोला योग्य भाव मिळाला तर ठीक नाहीतर ऊसाला खत म्हणून याचा वापर केला जातो. पाऊण एकरमध्ये टोमॅटोच्या माध्यमातून 40 हजार रुपये मिळाले. तर मिरचीच्या माध्यमातूनही 40 हजार रुपये, असे एकूण 80 हजार रुपये त्यांना मिळाले. अशाप्रकारे 2 ते 3 महिन्यात त्यांननी ही कामगिरी करुन शेतकऱ्यांसमोर चांगले उदाहरण ठेवले आहे.