जालना : कितीही संकटे आले तरी शेतकरी कधीच खचत नाही. वेगवेगळे आसमानी आणि सुलतानी संकटी येऊन देखील शेतकरी शेतात बिजाची पेरणी करणं सुरूच ठेवतो. त्याची उत्तम फळे देखील शेतकऱ्याला नेहमीच मिळत असतात. पारंपारिक पिकांबरोबर वेगवेगळी पिके आणि प्रयोग करून देखील शेतकरी चांगला आर्थिक फायदा मिळवत असतात. जालन्यातील प्रगतशील शेतकरी उद्धव खेडेकर यांनी कांदा बीजोत्पादन वाढीसाठी मधमाशी पालनाचा प्रयोग केला आहे. मधमाश्या चांगल्या प्रकारे परागीभवन घडवून आणत असल्याने कांद्याच्या उत्पन्नात 20 ते 30 टक्के वाढ होतीये. त्याचबरोबर मधमाशी पालनातून वर्षाकाठी तब्बल 3 लाखांचं उत्पन्न देखील खेडेकर यांना मिळत आहे.
advertisement
मधमाशी पालनाचा अभिनव प्रयोग
जालना जिल्ह्यातील शिवनी या खेडेगावातील रहिवासी असलेले उद्धव खेडेकर हे नेहमीच वेगवेगळे प्रयोग आपल्या शेतामध्ये करत असतात. प्रगतशील शेतकरी म्हणून परिसरात ख्याती असलेल्या उद्धव खेडेकर तब्बल तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. यंदाही त्यांनी आपल्या शेतामध्ये कांदा भिजोत्पादन वाढीसाठी मधमाशी पालनाचा अभिनव प्रयोग केलाय.
लाल नाहीतर पांढरी स्ट्रॉबेरी, बाजारात मिळतोय तिप्पट दर; पाहा शेतकऱ्यानं कशी केली शेती video
दरवर्षी 20 ते 21 एकर बीज उत्पादनाचा कांदा त्यांच्या शेतामध्ये लागवड केलेला असतो. यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाण्याची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे केवळ दोन एकरावर त्यांनी कांद्याची लागवड केली आहे मात्र पारंपारिक पद्धतीने लागवड न करता शेडनेटमध्ये त्यांनी बीज उत्पादनासाठीचा कांदा लावलाय. त्याचबरोबर पाण्याची बचत व्हावी म्हणून मल्चिंगचा देखील वापर केला आहे. कांद्याच्या उत्पादन वाढीसाठी त्यांनी एकरी दोन याप्रमाणे मधमाशांच्या पेट्या कांद्याच्या शेतात ठेवल्या आहेत. एका एकर साठी दोन मधमाशांच्या पेट्या पुरेशा असल्याचं उद्धवराव खेडेकर यांनी सांगितलं.
1 एकर रेशीम शेतीतून तरुण शेतकरी झाला लखपती; नोकरी सोडून कसं मिळवलं यश?
त्यांच्याकडे एकूण 250 मधमाशी पेट्या आहेत. यातून वर्षाकाठी 2 हजार किलो मध त्यांना मिळतो. दीडशे रुपये प्रति किलो या पद्धतीने मधाची विक्री केली जाते यातून त्यांना 3 लाखांचे उत्पन्न मिळतं. तर मधमाशा या कांद्याच्या फुलावर बसून चांगल्या प्रकारे परागीभवन घडवून आणत असल्याने कांद्याच्या बीजोत्पादनामध्ये तब्बल 20 ते 30 टक्क्यांची वाढ होती. यामुळे मधमाशी पालनातून मिळणारा मध आणि उत्पन्नामध्ये 20 ते 30 टक्क्यांची हमी असं एकमेकांना पूरक व्यवसाय उद्धवराव खेडेकर यांनी केला आहे. इतर शेतकऱ्यांनी देखील वेगवेगळे प्रयोग करून शेती फायदेशीर बनवावी, असे आवाहन खेडेकर करतात.
परदेशी भाज्या करतायेत मालामाल, साताऱ्यातील शेतकऱ्याची महिन्याला अडीच लाखांची कमाई, Video
मेनाच्या विक्रीतून ट्रान्सपोर्टेशन आणि स्थलांतराचा खर्च
माझ्याकडे 250 मधमाशी पेट्या आहेत. मुख्यतः कांद्याच्या बीज उत्पादनात वाढ व्हावी म्हणून मधमाश्याचे पालन मी करतो. कांद्याचा हंगाम केवळ तीन ते चार महिन्यांचा असतो. त्यातही फुलोऱ्याचा काळ केवळ एकच महिन्याचा असतो मात्र मधमाशांना जिवंत ठेवण्यासाठी वर्षभर फुलांची आवश्यकता असते. त्यामुळे या मधमाशांचे वर्षभर वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर केले जातं. या स्थलांतरासाठी भरपूर खर्च येतो मात्र मधमाशांनी तयार केलेल्या मधाच्या आणि मेनाच्या विक्रीतून त्यांचा ट्रान्सपोर्टेशन आणि स्थलांतराचा खर्च निघतो, असं उद्धव खेडेकर यांनी सांगितलं.





