जालना: माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये प्रत्येकाला विकास करण्याची संधी उपलब्ध होत आहे. नोकरी असो की उद्योग व्यवसाय हल्लीचे तरुण वेगवेगळ्या वाटा चोखळून त्यामध्ये यश मिळवत आहेत. जालना जिल्ह्यातील पिरकल्याण गावच्या विशाल वाघमारे या युवा तरुणाची अशीच काहीशी कहाणी आहे. फार्मसीच्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत असलेला विशाल हा दुग्ध व्यवसायातून महिन्याला 1 लाख रुपयांची कमाई करतोय. एका म्हशीपासून सुरू झालेला त्याचा दुग्ध व्यवसाय आता नऊ म्हशी पर्यंत पोहोचलाय. आणखी दहा म्हशी हरियाणा राज्यातून मागवून या व्यवसायाला विस्तारित करण्याचा विशाल याचा मानस आहे .
advertisement
कशी केली व्यवसायला सुरुवात?
विशाल वाघमारे हा पिरकल्याण या छोट्या खेडेगावातील रहिवासी आहे. त्याचा एक छोटा भाऊ डॉक्टर होण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे विशाल याने फार्मसीचे शिक्षण निवडलं. सध्या तो फार्मसीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेतोय मात्र शिक्षण घेऊन नोकरी करणं त्याच्या मनाला कधीच पटलं नाही. म्हणून त्याने सहा महिन्यांपूर्वी एका म्हशीपासून दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली. दुग्धव्यवसायातील आर्थिक गणित लक्षात आल्यानंतर त्याने हा व्यवसाय वाढवत नेला.
सध्या विशाल याच्याकडे तब्बल नऊ म्हशी आणि दोन एचएफ गाई आहेत. या नऊ म्हशी पासून 30 ते 35 लिटर दूध एका वेळेला डेअरीला जातं तर गायींचा दहा लिटर दूध डेअरीला जातं असे एकूण दिवसाला 80 लिटर दूध विशाल विक्री करतो. यातून त्याला दररोज तीन ते साडेतीन हजार रुपये मिळतात. त्याचबरोबर गाई, म्हशींपासून निघणाऱ्या शेणाच्या विक्रीतूनही वर्षासाठी 60 ते 65 हजार रुपये सहज मिळतात. नोकरी करून 50 ते 60 हजारांची कमाई करण्यापेक्षा महिन्याला 1 लाख रुपये देणारा उद्योगच बरा अशी भावना विशाल व्यक्त करतो.
वडिलांनी सव्वा एकरात लावली 50 झाडे, शेतकरी पुत्र घेतोय 3 लाखांचं उत्पन्न, Video
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. यामुळे चाऱ्याची थोडी अडचण आहे म्हणून सगळा चारा विकतचा आहे. तरीदेखील मला हा व्यवसाय पुरत आहे. या व्यवसायासाठी एकूण 11 लाखांची इन्व्हेस्टमेंट केलीये. हरियाणावरून आणखीन दहा मुरा जातीच्या म्हशी आणि त्यासोबत एक माणूस कामाला लावणे असं माझं भविष्यातील नियोजन आहे. त्यासाठी गोठ्याची बांधणी करून ठेवली आहे. जालना शहरामध्ये दूध डेरी टाकण्याचे देखील नियोजन असल्याचे विशालने सांगितलं.