सातारा : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग कायम दुष्काळी असतो. याच परिसरात डोंगरालगत होलेवाडी हे छोटे गाव आहे. गावाला पिण्याच्या पाण्यासाठी टँकर घ्यावे लागतात. अशाच डोंगराळ भागात वडिलोपार्जित असलेल्या शेत जमिनीत बाळकृष्ण बनगर यांनी रंगीत ढोबळी मिरचीची लागवड केली आहे. यामधून त्यांना लाखोंची कमाई होत आहे.
कशी साधली किमया?
advertisement
बाळकृष्ण बनगर यांनी अकरावी शिक्षणानंतर शेती करण्याचा निर्णय घेतला. घरचा व्यवसाय मेंढ पाळीचा होता. त्यामुळे मेंढ्या सोबत फिरताना त्यांनी त्या ठिकाणचे शेतकरी विविध प्रयोग करून डोंगरी भागामध्ये लाखों रुपयांचे उत्पादन आपल्या शेतातून घेत आहेत हे पहिले. त्यामुळे त्यांनी आले, टोमॅटो, काकडी, झेंडू अशा प्रकारची शेती केली मात्र गेल्या दोन वर्षांपासून ते मल्चिंग पेपरचा वापर करत रंगीत ढोबळी मिरचीची लागवड करत आहेत.
पुण्याच्या पाटलाची कमाल, चक्क टेरेसवर फुलवली फळबाग, एकदा नक्की पाहाच...Video
होलेवाडी या गावात पाण्याची खूप टंचाई असते. या परिस्थितीत शेतामध्ये कमी पाण्यावर येणाऱ्या पिकाची लागवड करण्यास सुरुवात मी सुरुवात केली आणि प्रगती साधली आहे. गेल्या वर्षी मला 8 ते 10 लाख रुपयांचे उत्पन्न रंगीत ढोबळी मिरची लागवड यामधून झाले होते, असं बाळकृष्ण बनगर यांनी सांगितले.
दुष्काळी भागातील शेतकऱ्यानं यशस्वी केला सफरचंदाच्या शेतीचा प्रयोग; आता लाखोंची कमाई PHOTOS
एका एकरमधून रंगीत ढोबळी मिरचीचे 17 ते 20 टन मालाचे उत्पादन मी घेतो. या ढोबळी मिरचीची विक्री ही महाराष्ट्र बाहेर पर राज्यात केली जाते. यामुळे ढोबळी मिरचीला बाजारभाव 40 ते 100 रुपयेपर्यंत मिळतो. त्यामुळे वार्षिक उत्पन्न सरासरी 8 ते 10 लाख रुपये यावर्षीही होणार असल्याचे देखील बाळकृष्ण बनगर सांगितले आहे.





