सोलापूर : फक्त नोकरीच्या माध्यमातूनच नव्हे तर शेतीच्या माध्यमातूनही अनेक जण चांगल्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न मिळवत आहे. सोलापुरातील एका शेतकऱ्याने हे पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवले आहे. सोलापुरातील शेतकरी बंडू हरिदास शिंदे यांनी आपल्या 3 एकर शेतात डाळिंब पिकातून अविश्वसनीय यश मिळवले आहे. रासायनिक व जैविक खतांचा योग्य वापर करून, उच्च गुणवत्तेची डाळिंबे त्यांनी दुबईच्या मार्केटमध्ये विक्री केली. व्यापाऱ्यांकडून त्यांना प्रतिकिलो 180 रुपये दर मिळाला आणि अशाप्रकारे त्यांनी एकूण 52 लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले. याचबाबत घेतलेला हा विशेष आढावा.
advertisement
प्रगतशील शेतकरी बंडू हरिदास शिंदे हे मूळचे निमगाव टेंभुर्णी येथील रहिवासी आहेत. नागनाथ शिंदे व बंडू शिंदे यांनी काही वर्षांपूर्वी शिराळ (मा) येथे माळरान जमीन खरेदी केली होती. कालांतराने त्याला बागायती क्षेत्र केले. रासायनिक व जैविक खतांचा योग्य मेळ घालत योग्य पद्धतीने खताचा वापर केल्याने झाडांची जोमात वाढ होऊन फळांची वाढ, वजन, गोडी व चकाकी वाढली. त्यांना प्रतिझाड सरासरी 20 किलो डाळिंब निघाले.
चोरलेला मनी प्लांट लावणं शुभ की अशुभ?, अनेकांना माहिती नसेल, महत्त्वाची माहिती.., VIDEO
200 ते 400 ग्रॅमपर्यंत वजन मिळाले. हे सर्व डाळिंब व्यापाऱ्यांनी स्वतः शेतकऱ्याच्या बांधावर येऊन बिगरखर्ची प्रतिकिलो 180 रुपये उच्चांकी दर देऊन दुबईला निर्यात केले. त्यांचा 3 एकरातून एकूण 30 टन डाळिंब निर्यात झाले आहेत. यासाठी त्यांना सरासरी एकरी 2.5 लाख रुपये म्हणजे तीन एकरासाठी एकूण 7.5 लाख रुपये खर्च झाला आहे. यासाठी त्यांना औदुंबर कुबेर, नितीन कापसे, सुशीलकुमार टोणपे, दादा शिंदे, अभिजित फाटे, अमोल फाटे व सोमनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
एकरी 4 ट्रेलर शेण खत सुरुवातीस प्रतिझाड 1 किलो व रेस्टनंतर दर दीड महिन्याला 1 किलो रासायनिक भेसळ खत व या भेसळ खतामध्येच जैविक खत वापरले. त्याचबरोबर वाळवी, हुमणी, किडी, गोगलगाय होऊ नये म्हणून भूअत्र प्रतिएकर 6 किलो वापरले. यामुळे जमिनीची सुपिकता वाढून गांडूळ संख्या वाढण्यास मदत झाली. यावेळी बागेवर मर व तेल्या रोग येऊ नये, यासाठीही विशेष खबरदारी घेण्यात आली. शेतकऱ्यांनी जर स्वतः हून या पिकाची काळजी घेतली, तर हा चांगला पीक आहे. या पिकातून चांगला उत्पन्नसुद्धा मिळतो, असे आवाहन प्रगतशील बागायतदार शेतकरी बंडू हरिदास शिंदे यांनी केले आहे.