गेल्या आठवड्यात बीएसईचा 30 शेअर्स असलेला सेन्सेक्स 1,707.01 अंकांनी किंवा 2.10 टक्क्यांनी वधारला. गुरुवारी (12 सप्टेंबर) सेन्सेक्सने 83,116.19 अंकांची सर्वोच्च पातळी गाठली.
या कंपन्यांच्या गुंतवणूकदारांनी गेल्या आठवड्यात पैसे कमावले
न्यूज एजेन्सी पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात भारती एअरटेलचे मार्केट व्हॅल्यूएशन 54,282.62 कोटी रुपयांनी वाढून 9,30,490.20 कोटी रुपये झाले. ICICI बँकेचे मार्केट कॅप 29,662.44 कोटी रुपयांनी वाढून 8,80,867.09 कोटी रुपये झाले. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे बाजार भांडवल 23,427.12 कोटी रुपयांनी वाढून 16,36,189.63 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. हिंदुस्तान युनिलिव्हरचे बाजारमूल्य 22,438.6 कोटी रुपयांनी वाढून 6,89,358.33 कोटी रुपये आणि HDFC बँकेचे बाजारमूल्य 22,093.99 कोटी रुपयांनी वाढून 12,70,035.77 कोटी रुपयांवर पोहोचले.
advertisement
इन्फोसिसचे मार्केट कॅप 17,480.49 कोटी रुपयांनी वाढून 8,07,299.55 कोटी रुपयांवर आणि ITC चे 15,194.17 कोटींनी रुपयांनी वाढून 6,42,531.82 कोटी रुपये झाले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्हॅल्यूएशन 9,878.19 कोटी रुपयांनी वाढून 19,92,160.61 कोटी रुपये झाले. SBI चे मार्केट कॅप 7,095.07 कोटी रुपयांनी वाढून 7,05,535.20 कोटी रुपये झाले.
गेल्या आठवड्यात LIC च्या गुंतवणूकदारांचे नुकसान झाले
भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) चे बाजार भांडवल 3,004.38 कोटी रुपयांनी घसरून 6,54,004.76 कोटी रुपयांवर आले आहे.
मोठा दिलासा! या तारखेपर्यंत फ्रीमध्ये अपडेट करता येणार Aadhaar Card
टॉप-10 कंपन्यांची लिस्ट
टॉप-10 सर्वात व्हॅल्यूएबल कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर टीसीएस, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एसबीआय, हिंदुस्थान युनिलिव्हर, एलआयसी आणि आयटीसी यांचा क्रमांक लागतो.
P N Gadgil Jewellers IPO ची चर्चा तर होणारच, शेअर कितीला पोहोचणार? ग्रे मार्केट आलंय तुफान!
शेअर बाजार म्हणजे काय?
शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केट हे ठिकाण आहे जिथे सार्वजनिकरित्या लिस्टेड कंपनीच्या शेअर्सची खरेदी, विक्री आणि व्यापार होतो. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट खाते आवश्यक आहे. भारतात, सेबी सिक्युरिटीज आणि कमोडिटी मार्केटला रेग्युलेट करण्यासाठी काम करते.
