बजाज हाउसिंग फायनान्सचं शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग झालं. त्यानंतर गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. या कंपनीचा आयपीओबीएसई आणि एनएसई दोन्ही ठिकाणी 114.29 टक्के प्रीमिअमसह 150 रुपयांवर लिस्ट झाला आहे. या कंपनीच्या एका शेअरची किंमत 70 रुपये होती. लिस्टिंग नंतर त्याला गती मिळाली आणि काही वेळातच एका शेअरची किंमत 155 रुपयांच्या पुढे गेली.
advertisement
गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, बजाज हाउसिंग फायनान्सच्या आयपीओमध्ये गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 80 रुपये नफा मिळाला. शेअरने 114.29 टक्क्यांचा चांगला लिस्टिंग फायदा दिला आहे.
कंपनीने आयपीओद्वारे 6560 कोटी रुपये उभारण्याची योजना आखली होती. या आयपीओला अंदाजे 64पट जास्त सबस्क्रिप्शन मिळालं होतं. त्यामुळे या शेअर्सबद्दलमार्केट एक्सपर्ट्सदेखील उत्साहित आहेत. त्यांच्या मते, कंपनीचं बिझनेसमॉडेल अतिशय मजबूत आणि चांगलं आहे. सध्या देशातील गृहनिर्माण क्षेत्राची स्थिती देखील बरीच सकारात्मक आहे. त्यामुळे हे शेअर्स दीर्घ मुदतीत चांगली कामगिरी करू शकतात. गुंतवणूकदारांना याचा फायदा होईल. लहानगुंतवणूकदारांना प्रॉफिट बुकिंग करण्याचा सल्ला दिला जात आहे.
एका लॉटवर17हजार रुपयांचा नफा
किरकोळ गुंतवणूकदारांना 214 शेअर्सच्या एका लॉटसाठी 14,980 रुपयांची गुंतणूक करावी लागली होती. एखाद्याला एक लॉट मिळाला असेल तर आज त्याच्या 14,980 रुपयांचे 32हजार 57 रुपये झाले असतील. म्हणजेच एका दिवसात 17 हजार रुपये नफा मिळाला असेल. ग्रे मार्केटमध्ये हा शेअर145 रुपयांवर लिस्ट होईल, असा अंदाज होता. पण,हा आयपीओ ग्रे मार्केटच्या अंदाजापेक्षा जास्त प्रीमिअमसह मार्केटमध्ये आला.
