TRENDING:

8700000 कोटी स्वाहा! क्रॅप्टो मार्केटमध्ये भूकंप, 7 महिन्यांत निच्चांकी किंमतीवर पोहोचलं बिटकॉईन

Last Updated:

बिटकॉइन सात महिन्यांच्या नीचांकी स्तरावर, ८८,५२२ डॉलरपर्यंत घसरला. गुंतवणूकदारांचे ८० लाख कोटींहून अधिक नुकसान. जेम्स बटरफिल, मॅथ्यू होगन यांनी बाजारातील अनिश्चिततेवर भाष्य केले.

advertisement
जागतिक बाजारपेठेत सध्या हाहाकार माजला आहे. क्रिप्टोकरन्सी बाजारात आलेला भूकंप थांबायचं नाव घेत नाहीये. बुधवारीही या बाजारात मोठी घसरण दिसून आली आणि जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असलेला बिटकॉइन तब्बल सात महिन्यांच्या आपल्या सर्वात नीचांकी स्तरावर पोहोचला. धडामकन घसरणीमुळे क्रिप्टो गुंतवणूकदारांचे जवळपास १ ट्रिलियन डॉलरहून अधिक भारतीय रुपयात विचार करायचा झाला तर ८० लाख कोटींहून अधिक रुपयांचं नुकसान झालं आहे.
News18
News18
advertisement

न्यूयॉर्क ट्रेडिंग सेशनमध्ये बिटकॉइनची किंमत ९०,००० डॉलरच्याही खाली घसरली आणि एका क्षणाला ती ८८,५२२ डॉलरपर्यंत खाली गेली होती. या सलग नुकसानीचा फटका लहान रिटेल गुंतवणूकदारांपासून ते मोठ्या डिजिटल-असेट ट्रेझरी कंपन्यांपर्यंत सर्वांना बसला आहे. दिवसअखेर, एनव्हिडियाच्या मजबूत महसूल अंदाजामुळे बाजाराला थोडीशी स्थिरता मिळाली आणि अनेक क्रिप्टो टोकन्स त्यांच्या दिवसातील नीचांकी स्तरावरून थोडं सावण्यात यश आलं.

advertisement

सात महिन्यांच्या निच्चांकी स्तरावर, घसरण सुरू झाली

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, या वर्षाच्या सुरुवातीला बिटकॉइनमध्ये १,२६,००० डॉलरपर्यंत जोरदार वाढ झाली होती. या तेजीमागे दोन प्रमुख कारणे होती: एक म्हणजे फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा आणि दुसरे म्हणजे मोठ्या संस्थागत गुंतवणूकदारांचा सहभाग वाढेल, आता ही दोन्ही आशादायक कारणे फिकी पडली आहेत. यामुळे मुव्हमेंटमन पाहून व्यापार करणारे ट्रेडर बाजारातून माघार घेत आहेत.

advertisement

बाजार विश्लेषकांच्या मते, आता गुंतवणूकदारांचे लक्ष क्रिप्टोच्या पुढील महत्त्वाच्या स्तरांवर लागलं आहे. तज्ज्ञांच्या मते, बिटकॉइनला ८५,००० डॉलर आणि ८०,००० डॉलरजवळ मजबूत फिजिकल सपोर्ट आहे. बिटकॉइनच्या घसरणीसोबतच इतर मार्केट देखील कोसळलं आहे. वर्षाच्या पहिल्या टप्प्यात ईथरने बिटकॉइनपेक्षा कमकुवत कामगिरी केली होती, पण ऑगस्टमध्ये ते जवळजवळ ५,००० डॉलरच्या जवळ पोहोचले होते आणि आपल्या जुन्या उच्चांकाला पार करण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, आता ईथरने जेवढं कमावलं तेवढ्याच झटकन गमावलं देखील अशी अवस्था झाली.

advertisement

या संपूर्ण परिस्थितीवर भाष्य करताना, कॉईनशेअर्सचे संशोधन प्रमुख जेम्स बटरफिल यांनी म्हटले आहे की, गुंतवणूकदार सध्या अंधारात तीर चालवण्यासारखी परिस्थिती आहे. कारण त्यांना मोठ्या आर्थिक संकेतांकडू बाजाराची कोणतीही स्पष्ट दिशा मिळत नाहीये. ते केवळ मोठे गुंतवणूकदार किंवा "व्हेल" काय करत आहेत, याकडे पाहत आहेत आणि याच अनिश्चिततेमुळे बाजारातील अस्वस्थता वाढत आहे. बिटवाईज ॲसेट मॅनेजमेंटचे चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर मॅथ्यू होगन यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, "आम्ही विक्रीच्या अंतिम टप्प्याजवळ निश्चितच आहोत, पण बाजार अजूनही सावरलेला नाही आणि क्रिप्टोला स्थिर आधार मिळण्यापूर्वी आणखी चढ-उतारांना तोंड द्यावे लागू शकते."

advertisement

मराठी बातम्या/मनी/
8700000 कोटी स्वाहा! क्रॅप्टो मार्केटमध्ये भूकंप, 7 महिन्यांत निच्चांकी किंमतीवर पोहोचलं बिटकॉईन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल