नोकरदार कर्मचाऱ्यांच्या स्टँडर्ड डिडक्शन हे 50,000 रुपयांवरून 75,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आलं आहे. नवीन कर प्रणालीनुसार आता 5 -10 लाख पॅकेज असणाऱ्या नोकरदार वर्गाला वर्षाला किती इनकम टॅक्स भरावा लागणार आहे? पाहूयात.
( budget 2024 : काय होणार महाग? कोणत्या आहे वस्तू? बजेटमधील मोठी बातमी )
नवीन कर प्रणालीनुसार,
0-3 लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या नोकरदार वर्गाला कर भरावा लागणार नाही.
advertisement
3-7 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या नोकरदार वर्गाला 5% कर भरावा लागणार आहे.
7-10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या नोकरदार वर्गाला 10% कर भरावा लागणार आहे.
10-12 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या नोकरदार वर्गाला 15% कर भरावा लागणार आहे.
12-15 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या नोकरदार वर्गाला 20% कर भरावा लागणार आहे.
15 लाख आणि त्याहून अधिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्या नोकरदार वर्गाला 30% कर भरावा लागणार आहे.
पेन्शनधारकांसाठी कौटुंबिक निवृत्ती वेतनावरील कपात 15,000 रुपयांवरून 25,000 रुपये करण्याचा प्रस्ताव आहे.