TRENDING:

Income Tax Calculation: पगार 13.70 लाख तरी झिरो टॅक्स, नोकरदारांसाठी मोठी खुशखबर; संपूर्ण टॅक्स प्लॅनिंग

Last Updated:

Budget 2025 Income Tax: बजेट 2025 नंतर नोकरदार मध्यमवर्गासाठी इनकम टॅक्समध्ये मोठा दिलासा मिळणार असून 12 लाखांपर्यंत करपात्र उत्पन्नावर टॅक्स ‘झिरो’ होण्याची शक्यता आहे. न्यू टॅक्स रेजीममधील सुधारणा, स्टँडर्ड डिडक्शन आणि एम्प्लॉयर NPS च्या योग्य वापरामुळे टॅक्स प्लॅनिंगचे नवे मार्ग खुले झाले आहेत.

advertisement
News18
News18
advertisement

मुंबई : नोकरदार मध्यमवर्गासाठी 2025 पासून इनकम टॅक्समध्ये मोठी सवलत मिळणार आहे. सरकारने New Tax Regime अधिक आकर्षक करत कलम 87A अंतर्गत रिबेटची मर्यादा 7 लाखांवरून थेट 12 लाखांपर्यंत वाढवली आहे. म्हणजेच तुमची टॅक्सेबल इन्कम 12 लाखांपर्यंत असेल, तर टॅक्स देयक ‘झिरो’ होऊ शकते. पण इथेच गोष्ट थांबत नाही. स्टँडर्ड डिडक्शन ( 75,000) आणि एम्प्लॉयर NPS (80CCD(2)) योग्य पद्धतीने वापरल्यास, 12 लाखांपेक्षा जास्त पॅकेज असूनही ‘झिरो टॅक्स’च्या रेंजमध्ये राहता येऊ शकते, हीच आता अनेक नोकरदारांची टॅक्स प्लॅनिंग स्ट्रॅटेजी ठरतेय.

advertisement

बजेट 2025: New Tax Regime स्लॅब्स (FY 2025-26 / AY 2026-27)

सरकारने नव्या व्यवस्थेत स्लॅब्स साधे केले आहेत. (खालील स्लॅब्स “न्यू रेजीम”साठी आहेत)

0 ते 4,00,000: 0%

4,00,001 ते 8,00,000: 5%

advertisement

8,00,001 ते 12,00,000: 10%

12,00,001 ते 16,00,000: 15%

16,00,001 ते 20,00,000: 20%

20,00,001 ते 24,00,000: 25%

24,00,000 पेक्षा जास्त: 30%

टॅक्सेबल इन्कम 12 लाखांपर्यंत असेल, तर 87A रिबेटमुळे अनेक प्रकरणांत टॅक्स शून्य होऊ शकते.

advertisement

टॅक्स वाचवण्यासाठी दोन “खात्रीचे” पर्याय

1) स्टँडर्ड डिडक्शन: 75,000

नोकरदारांसाठी 75,000 स्टँडर्ड डिडक्शन लागू असल्यामुळे तुमचा करपात्र पगार थेट कमी होतो.

2) कॉर्पोरेट NPS: कलम 80CCD(2)

हा अनेकदा दुर्लक्षित राहणारा, पण ताकदवान पर्याय. एम्प्लॉयरने NPS मध्ये केलेले योगदान (salary = बेसिक + DA) FY 2025-26 पासून 14% पर्यंत deduction म्हणून मिळू शकते.

advertisement

13.70 लाख CTC असूनही “झिरो टॅक्स” कसा?

उदाहरण समजून घ्या:

CTC: 13,70,000

बेसिक (50% गृहित): 6,85,000

एम्प्लॉयर NPS @14% (80CCD(2)): 95,900

स्टँडर्ड डिडक्शन: 75,000

म्हणजे करपात्र उत्पन्नातून एकूण कपात:

95,900 + 75,000 = 1,70,900

आता करपात्र इन्कम: 13,70,000 1,70,900 = 11,99,100

ही रक्कम 12 लाखांखाली गेल्याने 87A रिबेट लागू होऊन टॅक्स देयक ‘झिरो’ होऊ शकते. (इतर स्पेशल-रेट उत्पन्न असल्यास नियम वेगळे लागू शकतात.)

कॉर्पोरेट NPS मध्ये लोकांची सर्वात मोठी चूक

80CCD(2) ची deductionतुमच्या स्वतःच्याNPS गुंतवणुकीवर नाही, ती फक्त एम्प्लॉयरच्या contribution वर मिळते. म्हणजे HR/Payroll मध्ये Employer NPS हा घटक सक्षम असणे गरजेचे.

हो, त्यामुळे इन-हँड सॅलरी थोडी कमी वाटू शकते; पण तो पैसा रिटायरमेंटसाठी साठतो आणि टॅक्सही वाचतो.

12 लाखच्या थोडं वर गेलं तर काय?

12 लाखच्या थोडं वर गेल्यावर “एकदम मोठा टॅक्स” बसू नये म्हणून मार्जिनल रिलीफचा पर्याय असतो; ज्यामुळे वाढलेल्या उत्पन्नापेक्षा टॅक्सची उडी अतिशय जास्त होणार नाही, हे पाहिले जाते.

NPS मध्ये 50,000 भरले तर न्यू रेजीममध्ये सूट मिळेल का?

न्यू रेजीममध्ये प्रामुख्याने एम्प्लॉयर NPS (80CCD(2)) मान्य आहे. एम्प्लॉयीच्या काही deduction (जसे 80CCD(1B)) न्यू रेजीममध्ये लागू होत नाहीत, असे अनेक टॅक्स-गाईड्स स्पष्ट करतात.

स्टँडर्ड डिडक्शनसाठी बिल दाखवावे लागते का?

नाही. हे फ्लॅट डिडक्शन आहे.

कंपनी NPS contribution देण्यास नकार देऊ शकते का?

Policy/Payroll सेटअप कंपनीनुसार बदलतो. पण 80CCD(2) हा एम्प्लॉयर-बेस्ड benefit असल्याने HR कडून सुविधा उपलब्ध आहे का, हे तपासा.

12 लाखच्या एक रुपयाने वर गेलो, तर पूर्ण टॅक्स भरावा लागेल का?

असं सरसकट नाही. Marginal relief मुळे धक्का कमी होतो.

न्यू रेजीममध्ये होम लोनवर deduction मिळते का?

न्यू रेजीममध्ये अनेक पारंपरिक deductions मर्यादित/बंद आहेत. पात्रता तुमच्या प्रकरणानुसार ठरते.

मराठी बातम्या/मनी/
Income Tax Calculation: पगार 13.70 लाख तरी झिरो टॅक्स, नोकरदारांसाठी मोठी खुशखबर; संपूर्ण टॅक्स प्लॅनिंग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल