निर्मला सीतारमन यांनी कृषीसह विविध क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा केल्या. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने सामान्य नागरिकांसह मध्यम वर्गालाही दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
>> काय स्वस्त होणार?
सूट असलेल्या भांडवली वस्तूंमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीसंदर्भातील 35 वस्तू
मोबाईलच्या बॅटरीसंदर्भातील 20 भांडवली वस्तूंना सूट
टीव्हीचे पार्ट्स स्वस्त होणार
कस्टम ड्युटीतून 36 महत्त्वाची औषधं वगळली
advertisement
कॅन्सरवरील औषध कस्टम ड्युटीतून वगळली
भारतात तयार झालेले कपडे स्वस्त होणार
>> काय महाग होणार?
इंटरॲक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्लेवरील सीमा शुल्क 10 टक्क्यांवरून 20 टक्के करण्यात येणार आहे.
अर्थसंकल्पात 'ग्यान'वर भर...
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, आमचे लक्ष 'ग्यान'वर आहे. GYAN म्हणजे G - गरीब, Y- तरुण, A- अन्नदाता आणि N - नारी शक्ती. आम्ही गेल्या 10 वर्षात बहुआयामी विकास केला असल्याचेही सीतारमन यांनी सांगितले.
कृषी क्षेत्रासाठी योजनांची घोषणा...
कृषी हे भारतीय अर्थव्यवस्थेचे इंजिन आहे. राज्यांच्या साह्याने पंतप्रधान धन धान्य योजना राबवली जाणार आहे असे सीतारामण यांनी म्हटले. या योजनेच्या माध्यमातून 100 जिल्हयांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. 1.7 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. तसेच इतर विविध योजना राबवल्या जाणार. उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बिहारमध्ये मखाणा उत्पादनावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी विशेष मखाणा बोर्डाची स्थापना केली जाणार. तूर, उडीद आणि मसूर डाळींच्या उत्पादनासंदर्भात विशेष लक्ष दिलं जाणार शेती उत्पादकता वाढवणे, विविध प्रकारची उत्पादनं आणि शाश्वत विकास साध्य करणं, माल साठवणूक पर्याय, सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे या गोष्टींवर लक्ष केंद्रीत केले जाणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सांगितले.
