बेंगळुरूमध्ये सीबीआयने (CBI) केलेल्या कारवाईत नेमकं हेच घडलं आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने भ्रष्टाचाराची ही 'काळी कमाई' कोणत्याही कपाटात नाही, तर चक्क तीन मोठ्या सुटकेसमध्ये भरून ठेवली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ माजली आहे.
बेंगळुरू येथील केंद्रीय विद्युत संशोधन संस्था (CPRI) मध्ये कार्यरत असलेले संयुक्त संचालक राजाराम मोहनराव चेनू यांना सीबीआयने अटक केली आहे. ही कारवाई 9.5 लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून करण्यात आली होती. मात्र, जेव्हा सीबीआयने त्यांच्या ठिकाणांवर छापेमारी केली, तेव्हा जे हाती लागलं ते पाहून अधिकारीही थक्क झाले. लाचेची किंमत लाखात होती, पण वसुली मात्र कोट्यवधीत झाली.
advertisement
सर्च ऑपरेशन दरम्यान सीबीआयला आरोपी अधिकाऱ्याच्या ताब्यातून तब्बल 3 कोटी 76 लाख रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही सर्व रोकड तीन मोठ्या सुटकेसमध्ये अक्षरशः ठुसठुसून भरली होती. एखाद्या अधिकाऱ्याने आपल्या पदाचा गैरवापर करून सिस्टीमला कशाप्रकारे वाळवी लावली आहे, याचे हे जिवंत उदाहरण ठरलं आहे.
सीबीआयने या प्रकरणात केवळ सरकारी अधिकाऱ्यालाच नाही, तर लाच देणाऱ्यालाही बेड्या ठोकल्या आहेत:
यामध्ये राजाराम मोहनराव चेनू: संयुक्त संचालक, CPRI (मुख्य आरोपी) आहेत. तर अतुल खन्ना हे संचालक, मेसर्स सुधीर ग्रुप ऑफ कंपनीज (सह-आरोपी) आहेत.
