असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत विकास महामंडळ (NHIDCL) च्या अधिकाऱ्याबाबत.
लाच घेताना रंगेहात पकडला अधिकारी
CBI ने 14 ऑक्टोबर रोजी NHIDCL चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि रिजनल ऑफिसर रीतेन कुमार सिंह यांना 10 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं. तपासात असं समोर आलं की त्यांनी मेसर्स मोहन लाल जैन कंपनी कडून “Extension of Time (EOT)” आणि “Completion Certificate” देण्यासाठी ही लाच मागितली होती. ही कंपनी आसाममधील राष्ट्रीय महामार्ग-37 च्या चार लेन प्रकल्पाशी संबंधित आहे.
advertisement
छापेमारीत सापडला ‘नोटांचा डोंगर’
या अटकेनंतर CBI ने गुवाहाटी, गाझियाबाद आणि इंफाळ येथे मोठ्या प्रमाणात छापेमारी केली. या दरम्यान अधिकाऱ्याच्या घरातून आणि ऑफिसमधून जप्त झालेल्या मालमत्तेची यादी चक्क एखाद्या मोठ्या उद्योगपतीलाही लाजवेल अशी आहे.
CBI च्या जप्त केलेल्या मालमत्तेत काय काय मिळालं?
या रेडमध्ये रोख रक्कम ₹2.62 कोटी सापडले.
दिल्ली–NCR: 9 आलिशान फ्लॅट्स, 1 प्रीमियम ऑफिस स्पेस, आणि 3 निवासी प्लॉट्स
बंगळुरू: 1 लग्झरी अपार्टमेंट आणि 1 प्लॉट
गुवाहाटी: 4 प्रीमियम फ्लॅट्स आणि 2 प्लॉट्स
इंफाळ वेस्ट: 2 होमस्टेड प्लॉट्स आणि 1 कृषी जमीन
6 उच्च दर्जाच्या लक्झरी गाड्यांचे कागदपत्रे
2 महागड्या घड्याळ्या आणि 100 ग्रॅम चांदीचा बार
CBI च्या माहितीनुसार, ही संपत्ती रीतेन कुमार सिंह आणि त्यांच्या कुटुंबाच्या नावावर खरेदी करण्यात आली आहे आणि कागदोपत्री दाखवलेला किंमतमान वास्तविक बाजारभावापेक्षा अनेक पटीने कमी आहे.
सध्या चौकशी सुरू
CBI ने रीतेन कुमार सिंह आणि विनोद कुमार जैन (मेसर्स मोहन लाल जैन कंपनीचे प्रतिनिधी) या दोघांना अटक करून स्पेशल CBI कोर्ट, गुवाहाटी (असाम) येथे हजर केले. न्यायालयाने दोघांनाही तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
तपास यंत्रणा आता या भ्रष्टाचाराच्या संपूर्ण जाळ्याचा शोध घेत आहे, जेणेकरून समजावं की लाचचा पैसा कोणत्या प्रकल्पांमधून आला आणि यात आणखी कोण अधिकारी किंवा कंपनी सहभागी आहेत का?