TRENDING:

मुलांच्या फ्युचर प्लॅनवर धोकादायक इशारा, 69 लाख अन् 1.4 कोटींचं सत्य ऐकून हादराल; Expertचा अलर्ट

Last Updated:

Child Investment Plans: सुकन्या समृद्धी आणि NPS वात्सल्य यांसारख्या योजना कोटींचे स्वप्न दाखवतात, पण वस्तुस्थिती वेगळी आहे. अर्थतज्ज्ञ गौरव मुंध्रा यांनी स्पष्ट इशारा दिला की या योजनेतील आकडे फसवणूक करू शकतात कारण महागाईनंतर त्यांची खरी किंमत खूपच कमी होते.

advertisement
मुंबई: बहुतेक लोकांना वाटतं की सुकन्या समृद्धी योजना किंवा एनपीएस वात्सल्यसारख्या योजनांमधील मोठी रक्कम जसे की 69 लाख रुपये किंवा 1.4 कोटी रुपये आपल्या मुलाच्या भविष्याची आर्थिक सुरक्षा देऊ शकेल. पण या आकड्यांचं खरे मूल्यमापन केलं तर वास्तव काहीसं निराशाजनक आहे.
News18
News18
advertisement

गौरव मुंध्रा जे Etica Wealth चे असोसिएट पार्टनर असून S&P Financial Services चे सह-संस्थापक आहेत. त्यांनी नुकतीच लिंक्डइनवर यावर एक पोस्ट केली आहे, जी सध्या खूप चर्चेत आहे. ते 1,000 हून अधिक कुटुंबांचं आर्थिक नियोजन हाताळतात आणि सांगतात की, बहुतांश गुंतवणूकदार मोठ्या आकड्यांवर भुलतात. पण महागाई (Inflation) लक्षात घेत नाहीत.

advertisement

सुकन्या समृद्धी योजना 21 वर्षांत 69 लाख रुपये परतावा दाखवते. पण महागाईनुसार समायोजन केल्यास ही रक्कम फक्त 17 लाख रुपये इतकीच खरी किंमत राखते. तर एनपीएस वात्सल्य योजना जरी 1.4 कोटी रुपये देण्याचं वचन देत असली. तरी प्रत्यक्ष हाती मिळणारी रक्कम फक्त 35 लाख रुपये असते. आणि तिची आजच्या किंमतीनुसार खरेदीशक्ती फक्त 8.4 लाख रुपये एवढीच आहे.

advertisement

आता स्वतःला विचार करा – 20 वर्षांनी तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी 8 लाख किंवा 17 लाख पुरतील का? असा मुंध्रा प्रश्न उपस्थित करतात.

त्याऐवजी मुंध्रा चिल्ड्रन्स म्युच्युअल फंड्स (Children’s Mutual Funds) मध्ये गुंतवणुकीचा सल्ला देतात. जर आपण 12% वार्षिक परताव्याचा अंदाज धरला, तर अशा फंडांमधून मिळणारी रक्कम 1.4 कोटींपर्यंत पोहोचू शकते. जी कर भरल्यानंतरही सुमारे 1.2 कोटी रुपये राहते आणि आजच्या किंमतीनुसार ती 34 लाख रुपये इतकी मूल्यवान ठरते.

advertisement

यात आणखी एक फायदा म्हणजे लवचिकता (Flexibility). उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या मुलीला 21 व्या वर्षी आजच्या 17 लाख रुपयांच्या समतुल्य रक्कम देऊ शकता आणि 26 व्या वर्षी पुन्हा 34 लाख रुपयांच्या समतुल्य रक्कम हे सर्व महागाईनुसार समायोजित मूल्य गृहीत धरून.

त्यामुळेच मोठ्या आकड्यांवर न भुलता, महागाईचा परिणाम आणि गुंतवणुकीचे प्रत्यक्ष मूल्य लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि भविष्यासाठी म्युच्युअल फंडासारखे अधिक लवचिक आणि प्रभावी पर्याय निवडणं शहाणपणाचं ठरू शकतं.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
मुलांच्या फ्युचर प्लॅनवर धोकादायक इशारा, 69 लाख अन् 1.4 कोटींचं सत्य ऐकून हादराल; Expertचा अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल