TRENDING:

China Gold: चीनला काही मोठं संकट आधीच दिसलं; 4,000 टन सोन्याने जगाला फुटला घाम, ऐन दिवाळीत झोप गमावली

Last Updated:

China Gold News: चीनने 2025 मध्ये सोन्याचा साठा तब्बल 500 टनांवरून थेट 4000 टनांपर्यंत वाढवून जगभरातील आर्थिक बाजारात धक्का दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, ही केवळ गुंतवणूक नसून डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान देणारी आर्थिक रणनिती आहे.

advertisement
News18
News18
advertisement

बीजिंग: जगातील आर्थिक महासत्तांमध्ये चीन नेहमीच एक पाऊल पुढे असते. पण 2025 मध्ये त्याने उचललेलं हे पाऊल इतकं मोठं आहे की जागतिक बाजारात अक्षरशः खळबळ उडाली आहे. कल्पना करा, एखादं राष्ट्र जे आधीच आर्थिक चमत्काराचं प्रतीक मानलं जातं आणि अचानक त्याचं सोन्याचं साठा 500 टनांवरून थेट 4000 टनांपर्यंत नेला तर...

advertisement

ही केवळ एक गुंतवणूक नाही, तर दूरगामी आर्थिक धोरणाचा भाग आहे आणि कदाचित जगाच्या वित्तीय व्यवस्थेतील मोठ्या वादळाची चाहूल आहे.

तज्ज्ञांचं मत आहे की चीनच्या या हालचालीमुळे डॉलरच्या वर्चस्वावर पहिल्यांदाच खोल परिणाम होऊ शकतो. सोने हे केवळ संपत्तीचं नव्हे तर सुरक्षेचंही प्रतीक असल्याने हा निर्णय धक्कादायक आणि अर्थपूर्ण मानला जातो. आता गुंतवणूकदारांच्या मनात एकच प्रश्न पडतोय की- चीनला काही मोठं संकट आधीच दिसलं आहे का?

advertisement

सोन्याचा साठा झपाट्याने वाढला

2025 च्या सुरुवातीपासूनच चीनने सोन्याची खरेदी प्रचंड वेगाने सुरू केली. जिथे त्याच्याकडे आधी सुमारे 500 टन सोने होतं, तिथे वर्षअखेरपर्यंत हा आकडा 4000 टनांहून अधिक झाला. ही वाढ एकदम झालेली नाही, तर अनेक महिने राबवलेल्या काटेकोर आणि नियोजनबद्ध खरेदीमुळे झाली आहे.

advertisement

जगभरात सोन्याचे दर आधीच चढलेले असताना चीनने त्याच संधीचा फायदा घेतला. चीनच्या केंद्रीय बँकेने दर महिन्याला लहान-लहान पण सातत्यपूर्ण प्रमाणात गुंतवणूक केली आणि या सततच्या खरेदीमुळे देशाचा एकूण सोन्याचा साठा प्रचंड वाढला.

ही केवळ आकड्यांची वाढ नव्हे, तर एका मोठ्या आर्थिक रणनीतीचा भाग आहे. सोने खरेदी करून चीन आपली अर्थव्यवस्था अधिक मजबूत करत आहे आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात स्वतःची पकड अधिक पक्की बनवत आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास आहे की हा निर्णय अमेरिकन डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेने चीनचं पाऊल आहे.

advertisement

बाजारात खळबळ का माजली?

चीनच्या या सोन्याच्या साठ्याच्या वाढीने जागतिक अर्थव्यवस्थेत लाट उसळली आहे. सोन्याच्या किंमती आधीच 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत आणि चीनच्या मागणीमुळे ही वाढ अजूनच वेगाने होत आहे. इतर देशांच्या केंद्रीय बँकाही आता सोनेकडे वळत आहेत. कारण रशियायुक्रेनसारख्या युद्धांनी एक गोष्ट शिकवली आहे. परकीय चलनावर अति अवलंबित्व धोकादायक असतं.

चीनचा हा निर्णय जगाला एक नवीन आर्थिक वास्तव दाखवत आहे. एक बहुध्रुवीय जागतिक अर्थव्यवस्था, जिथे केवळ डॉलरवर अवलंबित्व नसेल. अमेरिकन बाँड विकून आणि त्या बदल्यात सोने विकत घेऊन चीनने आर्थिक चातुर्य दाखवलं आहे. जे आगामी संकटांपासून बचावाचं साधन ठरू शकतं. पण आता प्रश्न असा आहे, यामुळे चलनयुद्धाची नवी फेरी सुरू होईल का? गुंतवणूकदारांसाठी यात एक मोठा संदेश आहे. सोने नेहमीच सुरक्षित आश्रयस्थान असतं.

चीनच्या सोन्याच्या खेळीचा प्रभाव

चीनचा हा सोन्याचा साठा केवळ संपत्तीचं प्रतीक नाही, तर जगासाठी एक इशारा देखील आहे. 4000 टन सोन्याच्या बळावर चीन कोणत्याही जागतिक संकटात अधिक ठामपणे उभा राहू शकतो. परंतु यामुळे जागतिक व्यापार, चलनांचे मूल्य आणि भू-राजकीय समीकरणे सर्व काही बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता प्रश्न असा आहे की, सोन्याच्या स्पर्धेचं पुढचं पर्व सुरु होणार का?

चीनची ही खेळी जगाला सांगते की आर्थिक जगतात मोठा बदल सुरू झाला आहे. गुंतवणूकदारांसाठी हा स्पष्ट इशारा आहे. सोन्याची चमक आता फक्त धातूची नाही, तर ती नव्या आर्थिक क्रांतीची झळाळी आहे.

मराठी बातम्या/मनी/
China Gold: चीनला काही मोठं संकट आधीच दिसलं; 4,000 टन सोन्याने जगाला फुटला घाम, ऐन दिवाळीत झोप गमावली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल