गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असून सध्या 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,30,000 घरात पोहोचला आहे. यामुळे धनत्रयोदशी’ आणि लक्ष्मीपूजन निमित्त सोनं खरेदी करण्याचा पारंपरिक संकल्प अनेकांना जड जात आहे.
Vasubaras 2025 : वसुबारसेला गायीची पूजा का करतात? 99 टक्के लोकांना हे माहिती नाही! Video
पुण्यातील प्रमुख फत्तेचंद रांका यांनी सांगितले की, सोनेखरेदीचा उच्चांक हा मागच्या वर्षीपेक्षा जास्त असू शकतो, दिवाळी हा सोन्याच्या खरेदीचा हंगाम असतोच, पण यंदा भाव जास्त असल्यामुळे ग्राहक लहान दागिने, हलकी चेन, अंगठ्या किंवा नाणी यांच्याकडे अधिक वळले आहेत.
advertisement
अनेक नागरिकांनी पारंपरिक सोनं खरेदी करण्याऐवजी सोने ETF किंवा डिजिटल गोल्डकडे वळण्यास सुरुवात केली आहे. जागतिक बाजारातील अस्थिरता, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन, जागतिक स्तरावर असलेले युद्धाचे सावट, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे टारिफचे धोरण आणि गुंतवणूकदारांचा वाढता कल या तिन्ही घटकांमुळे दरात तीव्र वाढ झाली आहे.
दरवाढ असूनही भावनिकदृष्ट्या सोनं घेणं शुभ ही भावना कायम असल्याने दुकानांत काही प्रमाणात खरेदी सुरू आहे. काही विक्रेत्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सवलती, मेकिंग चार्जवर सूट, किंवा चांदीच्या वस्तू भेट म्हणून देण्याच्या ऑफरही दिल्या आहेत.
दिवाळीत भाव स्थिर राहू शकतात
दिवाळीच्या मुहूर्तावर धनत्रयोदशीला आणि पाडव्याला अनेक नागरिक सोनेखरेदी करतात. मात्र दिवाळीत सोन्याचा भाव स्थिर राहू शकतो.