TRENDING:

22 सप्टेंबरपासून स्वस्त होणार LPG सिलिंडर? GST कपातीचा तुमच्या खिशावर किती होईल परिणाम?

Last Updated:

फूड आयटेम्स, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, वाहनं, एसी, टीव्ही अशा अनेक वस्तूंवरचा कर कमी करण्यात आला आहे. हा बदल 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे.

advertisement
मुंबई : भारतात वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST लागू झाल्यानंतर कर रचना सुलभ झाली आहे. दैनंदिन वापरातील वस्तूंपासून ते मोठ्या लक्झरी प्रोडक्ट्सपर्यंत जीएसटीचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होतो. दुसरीकडे, स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे LPG सिलेंडर. घरगुती जीवनात एलपीजीशिवाय जेवण तयार करणे अशक्य आहे. त्यामुळे दरांमध्ये थोडाही बदल झाला, तरी त्याचा सरळ परिणाम लाखो कुटुंबांवर होतो.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

3 सप्टेंबर रोजी झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत मोठे बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये 12% आणि 28% या स्लॅब रद्द करून फक्त 5% आणि 18%. असे दोनच स्लॅब ठेवण्यात आले. यामुळे फूड आयटेम्स, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, वाहनं, एसी, टीव्ही अशा अनेक वस्तूंवरचा कर कमी करण्यात आला आहे. हा बदल 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे.

advertisement

22 सप्टेंबरपासून कार आणि वाहानांवरील GST कमी होणार असल्याचं म्हटलं जात आहे, तर अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे दर देखील कमी होतील असं म्हटलं जात आहे. पण या सगळ्यात LPG चे कर देखील कमी होतील का? असा प्रश्न अनेक लोकांना पडला आहे.

याचे उत्तर मात्र थोडे निराशाजनक आहे. सरकार घरगुती सिलेंडरवर 5% जीएसटी आकारते, तर व्यावसायिक (Commercial) सिलेंडरवर 18% जीएसटी लावते. या वेळच्या कौन्सिल मीटिंगमध्ये LPG सिलेंडरवर जीएसटी कमी करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. म्हणजेच 22 सप्टेंबरनंतरही एलपीजी सिलेंडरचे दर अपरिवर्तित राहतील.

advertisement

कमर्शियल सिलेंडरवर 18% जीएसटी का?

हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, मिठाई दुकानं किंवा अन्य व्यावसायिक ठिकाणी वापरले जाणारे सिलेंडर हे कमर्शियल श्रेणीत येतात. व्यवसायातून थेट नफा होत असल्याने यावर जास्त कर म्हणजेच 18% GST लागू केला जातो. मात्र घरगुती सिलेंडरवर फक्त 5% जीएसटी आकारला जातो.

काय काय होणार स्वस्त?

या सुधारित निर्णयामुळे FMCG प्रोडक्ट्स, आरोग्य सेवेशी निगडित वस्तू, शैक्षणिक साहित्य, इलेक्ट्रॉनिक सामान, कृषी उपकरणं, विमा आणि ऑटोमोबाईल या क्षेत्रातील अनेक उत्पादने स्वस्त होणार आहेत. हा निर्णय 2017 मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतरचा सर्वात मोठा बदल मानला जातो.

advertisement

मात्र, सिन प्रोडक्ट्सवर (जसे तंबाखू) जीएसटी 40% करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये यावेळी कोल्ड ड्रिंकचाही समावेश केला आहे. तर सुपर लक्झरी कारांवर देखील आता 40% जीएसटी लागू होणार आहे.

एकंदरीत, या मोठ्या जीएसटी सुधारांमुळे ग्राहकांना अनेक गोष्टींवर दिलासा मिळणार आहे. पण LPG सिलेंडर मात्र अजून स्वस्त होणार नाही.

मराठी बातम्या/मनी/
22 सप्टेंबरपासून स्वस्त होणार LPG सिलिंडर? GST कपातीचा तुमच्या खिशावर किती होईल परिणाम?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल