३० कोटींच्या कमाईवर किती कर द्यावा लागेल?
आयकर नियमांनुसार १५ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्तींवर ३०% कर लागू होतो. त्यामुळे नाविक पिंटू महाराच्या ३० कोटींच्या उत्पन्नावर एकूण करदायित्व जवळपास १२ कोटी ८० लाख रुपये एवढे होईल. यामध्ये इनकम टॅक्स ८.९८ कोटी रुपये त्यावर सरचार्ज ३.३२ कोटी रुपये आणि हेल्थ आणि एज्युकेशन सेस ४९.२१ लाख रुपये द्यावे लागतील.
advertisement
मात्र, व्यावसायिक उत्पन्नावर झालेला खर्च वजा करून कर आकारला जातो. जर पिंटू महारा आपल्या खर्चानंतर २० कोटींचे निव्वळ उत्पन्न दाखवले तर त्याला अंदाजे ८.५२ कोटी रुपये कर भरावा लागेल.
गुंतवणुकीचे महायुद्ध सुरू, तुमच्या एका चुकीमुळे होऊ शकतं लाखोंचं नुकसान
पिंटू महाराने एवढी मोठी कमाई कशी केली?
महाकुंभसाठी पिंटू महाराने तब्बल ७० नवीन नाव बांधल्या होत्या. यासाठी त्याने बँकेकडून कर्ज घेतले आणि दागिने गहाण ठेवले. त्याच्याकडे एकूण १३० नाव होत्या. ज्याद्वारे त्याने महाकुंभ दरम्यान दररोज सुमारे ५०,००० ते ५२,००० रुपये प्रति नाव कमावले. विशेष म्हणजे या मोठ्या व्यवस्थापनासाठी पिंटूच्या सोबत ३०० पेक्षा जास्त कामगार कार्यरत होते. या प्रचंड कमाईमुळे पिंटू महाराचे नाव सध्या चर्चेत आहे. महाकुंभसाठी होणारी गर्दी आणि त्यातून उत्पन्न कमवण्याची संधी शोधणाऱ्या पिंटूच्या सक्सेस स्टोरीची सध्या देशभरात चर्च सुरू आहे.