तुमच्या कारने हायवेवर प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच NHAI ने एक नवीन नियम लागू केला आहे. याअंतर्गत ज्यांच्या वाहनांमध्ये फास्टॅग नाही त्यांच्याकडून दुप्पट टोल टॅक्स आकारला जाणार आहे. यासंदर्भात NHAI कडून निवेदन जारी करण्यात आलं आहे.
काही लोक अजूनही विंडस्क्रीनवर फास्टॅग (Fastag) लावलेला नाही. त्यांना या सूचना देण्यात आला आहेत. लोक त्यांच्या कार किंवा इतर वाहनांच्या विंडस्क्रीनवर जाणूनबुजून फास्टॅग चिकटवत नाहीत, यावर कठोर कारवाई करण्यासाठी NHAI ने फास्टॅग संदर्भात नवीन नियम लागू केला आहे. आता जाणूनबुजून विंडस्क्रीनवर फास्टॅग न लावणाऱ्यांकडून अधिक कर वसूल केला जाईल.
advertisement
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार या संदर्भात जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे म्हटले आहे की विंडस्क्रीनवर फास्टॅग न लावल्याने टोल प्लाझावर खूप वेळ जातो. रांगेत उभ्या असलेल्या इतर वाहनांना त्रास होतो. या संदर्भात प्राधिकरणाने एसओपी जारी केला असून त्याअंतर्गत आता अशा वाहनचालकांकडून दुप्पट टोल टॅक्स वसूल केला जाईल. जे नियमाचं पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं प्राधिकरणाने म्हटलं आहे.