८ हजार ४५५ कोटी रुपये मार्केट कॅप
गारवेयर टेक्निकल फायबर्स लिमिटेडचे ५२ आठवड्यांचे उच्चांक बीएसईवर ४ हजार ९२५.८० रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांक ३ हजार ११६.१० रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप ८ हजार ४५५ कोटी रुपये आहे.
गारवेयर टेक्निकल फायबर्स शेअर प्राइस हिस्ट्री
गारवेयर टेक्निकल फायबर्सच्या शेअर्सच्या कामगिरीकडे पाहिल्यास गेल्या एका आठवड्यात 10.53% घट झाली आहे. गेल्या एका महिन्यात ७.४०% घसरण झाली आहे. मागील ३ महिन्यांत ४.०७% वाढ झाली आहे. या वर्षी २६.७०% वाढ नोंदवण्यात आली आहे. मागील एका वर्षात २६.५१% वाढ झाली आहे. गेल्या ३ वर्षांत या शेअर्सने ३२.०६% परतावा दिला आहे.
advertisement
बोनस शेअर्स म्हणजे काय?
बोनस इश्यू म्हणजे ज्यामध्ये कंपनी आपल्या विद्यमान शेअरधारकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता अतिरिक्त शेअर्स देते. हे शेअर्स साधारणतः शेअरधारकांकडे आधीपासून असलेल्या शेअर्सच्या प्रमाणात दिले जातात.
