TRENDING:

मेटल मार्केटमध्ये भूकंप, सोने-चांदीच्या किमतींमध्ये धक्का देणारी घसरण; ETF मध्ये मोठी उलथापालथ, धोका अजून कायम

Last Updated:

Gold And Silver Prices: 2 फेब्रुवारी 2026 रोजी सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली असून, चांदीत विक्रमी उच्चांकानंतर तीव्र करेक्शन झाले. जागतिक बाजारातील विक्रीचा थेट फटका देशांतर्गत बाजार आणि ETF गुंतवणूकदारांना बसला.

advertisement
2 फेब्रुवारी 2026 रोजी सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा मोठी घसरण पाहायला मिळाली. विशेष म्हणजे चांदीने अलीकडच्या काळात गाठलेल्या विक्रमी उच्चांकावरून जोरदार पडझड नोंदवली. एमसीएक्सवर गोल्ड फ्युचर्स तब्बल 3.22 टक्क्यांनी घसरून 10 ग्रॅममागे 1.43 लाख रुपयांवर आले, तर एमसीएक्स सिल्व्हर फ्युचर्स किलोमागे 2.48 लाख रुपयांवर पोहोचले. आंतरराष्ट्रीय बाजारातही दबाव कायम असून सोने सुमारे 4,662 डॉलर प्रति औंस आणि चांदी जवळपास 75 डॉलर प्रति औंस या पातळीवर व्यवहार करत होती.
News18
News18
advertisement

सोने-चांदीत घसरणीचं मुख्य कारण काय?

जागतिक बाजारात मेटल्समध्ये झालेल्या जोरदार विक्रीमुळे त्याचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारावर झाला. ही विक्री प्रामुख्याने दोन कारणांमुळे वाढली. पहिले म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केविन वॉर्श यांची पुढील फेडरल रिझर्व्ह चेअर म्हणून नामनिर्देशन केल्याची चर्चा. दुसरे म्हणजे CME (Chicago Mercantile Exchange) कडून मेटल फ्युचर्सवरील मार्जिन वाढवण्यात आले. या घडामोडींमुळे ट्रेडर्सनी जोखीम कमी करण्यासाठी पोजिशन्स घटवण्यास सुरुवात केली.

advertisement

फिजिकल गोल्डच्या किमतींचं चित्र काय?

देशातील प्रमुख शहरांमध्ये फिजिकल गोल्डच्या किमतींमध्ये काहीशी नरमी दिसून आली. मात्र तरीही मोठ्या मेट्रो शहरांमध्ये 24 कॅरेट सोने 15,000 रुपयांपेक्षा जास्त प्रति ग्रॅम या उच्च पातळीवरच व्यवहार करत राहिले. यामध्ये चेन्नईत सर्वाधिक दर नोंदवण्यात आले.

चांदीत घसरण जास्त का झाली?

चांदीमध्ये घसरणीचा फटका अधिक तीव्र होता. स्पॉट मार्केटमध्ये चांदीत सुमारे 6 टक्क्यांची घसरण झाली, तर एमसीएक्स सिल्व्हर फ्युचर्स 6.46 टक्क्यांनी कोसळले. गेल्या एका वर्षात चांदीने सोन्यापेक्षा चांगली कामगिरी केली होती. त्यामुळेच आता त्या जोरदार तेजीपाठोपाठ तीव्र करेक्शन पाहायला मिळत आहे.

advertisement

जागतिक घटकांनी दबाव कसा वाढवला?

विश्लेषकांच्या मते, केविन वॉर्श यांची ओळख ही ब्याजदरांबाबत कडक भूमिका घेणाऱ्या नेत्यांमध्ये होते. यासोबतच मजबूत अमेरिकी डॉलर, उच्च US ट्रेझरी यील्ड, अपेक्षेपेक्षा जास्त आलेला US प्रोड्युसर इन्फ्लेशन डेटा आणि CME कडील मार्जिन वाढ यामुळे बाजारातील काही मोठ्या गुंतवणूकदारांना आणि ट्रेडर्सना पोजिशन्स कमी कराव्या लागल्या.

पुढे गुंतवणूकदार कशावर लक्ष ठेवणार?

advertisement

आगामी काळात गुंतवणूकदार जागतिक अर्थव्यवस्थेच्या संकेतांसाठी विविध देशांच्या मॅन्युफॅक्चरिंग PMI डेटावर लक्ष ठेवणार आहेत. यामध्ये जपान, चीन, UK, फ्रान्स, जर्मनी, युरोझोन आणि अमेरिका यांचा समावेश आहे. या आकडेवारीतून जागतिक वाढीचा वेग आणि भविष्यातील ट्रेंड स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

2 फेब्रुवारीला गोल्ड आणि सिल्व्हर ETF मध्ये काय घडलं?

या दिवशी केवळ स्पॉट आणि फ्युचर्स मार्केटच नाही, तर गोल्ड आणि सिल्व्हर ETF मध्येही मोठी घसरण पाहायला मिळाली. मेटल्सच्या किमती सातत्याने दबावात राहिल्यामुळे ETF वरही नकारात्मक परिणाम झाला. याच काळात बाजारातील चढ-उतार वाढले आणि India VIX 15.55 या पातळीपर्यंत पोहोचला.

advertisement

सिल्व्हर ETF ची कामगिरी कशी राहिली?

Edelweiss Silver ETF आणि Axis Silver ETF सुमारे 20 टक्क्यांपर्यंत घसरले. त्याचप्रमाणे UTI Silver ETF, DSP Silver ETF, Aditya Birla Sun Life Silver ETF आणि Kotak Silver ETF मध्येही जवळपास २० टक्क्यांची घसरण नोंदवली गेली.

Mirae Asset Silver ETF, Motilal Oswal Silver ETF, 360 ONE Silver ETF आणि HDFC Silver ETF सुमारे 19 टक्के खाली आले, तर ICICI Prudential, Nippon India, SBI आणि Tata Silver ETF मध्ये सुमारे 18 टक्क्यांची घसरण झाली.

गोल्ड ETF ची स्थिती काय होती?

गोल्ड ETF मध्येही मोठा दबाव दिसून आला. Birla Sun Life Gold ETF आणि Motilal Oswal Gold ETF मध्ये ९ टक्क्यांहून अधिक घसरण झाली.

ICICI Prudential Gold ETF आणि Mirae Asset Gold ETF सुमारे 8 टक्के खाली आले. याशिवाय Edelweiss Gold ETF, HDFC Gold ETF, Baroda BNP Paribas Gold ETF आणि Nippon India ETF GoldBees यांमध्येही लक्षणीय घसरण पाहायला मिळाली.

ETF मधील घसरणीवर तज्ज्ञ काय म्हणतात?

Bonanza चे रिसर्च अ‍ॅनालिस्ट अभिनव तिवारी यांच्या मते, सध्याचा चढ-उतार असूनही दीर्घकालीन दृष्टीकोन अद्याप बुलिश आहे. त्यांनी सांगितले की, सेंट्रल बँकांकडून होत असलेली विक्रमी खरेदी, चांदीतील सप्लाय डेफिसिट आणि भू-राजकीय तणाव हे घटक मेटल्ससाठी मजबूत आधार तयार करतात.

दरम्यान Mirae Asset Investment Managers India मधील ETF प्रॉडक्ट आणि फंड मॅनेजर सिद्धार्थ श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले की, चांदीत आलेल्या तीव्र parabolic तेजी नंतर आता सावध भूमिका घेतली जात आहे. दीर्घकालीन रणनीतिक अलोकेशननुसार पोर्टफोलिओ पुन्हा संतुलित करण्यासाठी मेटल्समधील ओव्हरअलोकेशन कमी करण्याचा सल्ला दिला जात आहे.

मराठी बातम्या/मनी/
मेटल मार्केटमध्ये भूकंप, सोने-चांदीच्या किमतींमध्ये धक्का देणारी घसरण; ETF मध्ये मोठी उलथापालथ, धोका अजून कायम
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल