TRENDING:

सोन्याच्या दरात मोठी वाढ, पण कारण काय? आताच खरेदी करायचं की पाहायची वाट?

Last Updated:

आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेल्या अस्थिरतेमुळे सोने आणि चांदीच्या दरांना झळाळी मिळाली आहे. 24 कॅरेट सोने हे 90 हजारांच्या आसपास असून चांदीने तर 1 लाख रुपयांचा टप्पा पार केला आहे.

advertisement
नारायण काळे, प्रतिनिधी
advertisement

जालना : आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेल्या अस्थिरतेमुळे सोने आणि चांदीच्या दरांना झळाळी मिळाली आहे. 24 कॅरेट सोने हे 90 हजारांच्या आसपास असून चांदीने तर 1 लाख रुपयांचा टप्पा पार केला आहे. आगामी काळामध्ये सोन्याचे दर हे 95 हजार रुपये प्रति तोळा ते 1 लाख रुपये प्रति तोळापर्यंत वाढू शकतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेल्या तणावाच्या स्थितीमुळे आगामी काळात देखील सोने आणि चांदीच्या दरात तेजी राहण्याची शक्यता आहे. सोने बाजाराच्या स्थितीविषयी लोकल 18 ने जालना शहरातील सराफा असोसिएशनचे सचिव गिरिधर लाल लधाणी यांच्याशी संवाद साधला पाहुयात.

advertisement

संपूर्ण जगामध्ये तणावाचे वातावरण आहे. रशिया आणि युक्रेन युद्ध अजूनही संपत नाहीये. तसेच अमेरिकेत आलेल्या नवीन सरकार हे विविध देशांवर आयात कर लावत आहे. यामुळे देखील बाजारामध्ये खळबळ आहे. यामुळेच बाजारात अस्तित्वात कधी सोन्याचे दर वाढतात तर कधी थोड्याफार प्रमाणात कमी होतात. गुंतवणुकीचा सुरक्षित साधन म्हणून यामुळेच गुंतवणूकदार सोन्यामध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देत आहे. सोन्याची खरेदी वाढल्याने सोन्याला चांगली मागणी आहे. आणि यामुळेच सोन्याचे दर कमी होत नाहीये.

advertisement

e-KYC अजून केली नाही? उरले फक्त शेवटचे काही दिवस, अन्यथा रेशनचं धान्य होणार बंद!

मुंबई, दिल्ली, चेन्नई येथील मोठमोठ्या सोने व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार लवकरच सोने 93 हजार ते 95 हजार रुपये प्रति तोळापर्यंत पोहोचेल. परंतु बाजाराच्या स्थितीविषयी निश्चित सांगता येत नाही. एखाद्या वेळी सोन्याचे दर थोड्याफार प्रमाणात कमी देखील होऊ शकतात. चांदीला देखील चांगली मागणी आहे. चांदीला मागणी असण्याचे कारण म्हणजे चांदीचा वापर हा सोलार पॅनलमध्ये होतो, त्याचबरोबर फोटोग्राफीमध्ये आणि युद्धासाठी लागणाऱ्या साधनसामग्रीमध्ये देखील चांदीचा वापर होतो. त्यामुळे चांदीचे दर हे एक लाखाच्या वर पोहोचले आहेत.

advertisement

जालना शहरातील सराफा बाजारामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर हा 89 हजार 500 एवढा आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर हा  82 हजार 340 रुपये प्रति तोळा असा आहे. 20 कॅरेट सोन्याचा दर 75 हजार 780 रुपये प्रति तोळा तर 18 कॅरेट सोन्याचा दर हा 67 हजार 125 रुपये प्रति तोळा असा आहे. तर शुद्ध चांदी ही 1 लाख 2 हजार रुपये प्रति किलो या दराने विक्री होत आहे. चांदीचे चैन आणि इतर सुटे दागिने 81 हजार रुपये प्रति किलो या दराने विक्री केली जात आहेत, असं सराफा असोसिएशनचे सचिव गिरिधर लाल लधाणी यांनी सांगितलं.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
सोन्याच्या दरात मोठी वाढ, पण कारण काय? आताच खरेदी करायचं की पाहायची वाट?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल