e-KYC अजून केली नाही? उरले फक्त शेवटचे काही दिवस, अन्यथा रेशनचं धान्य होणार बंद!

Last Updated:

Ration Card e-KYC: गरीब आणि गरजूंपर्यंत पारदर्शकपणे रेशनच्या सेवा पोहोवण्यासाठी सरकारने महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतलीये. त्यामुळे 31 मार्चपूर्वी प्रत्येकाला ई-केवायसी करून घ्यावीच लागणार आहे.

e-KYC अजून केली नाही? उरले फक्त शेवटचे काही दिवस, अन्यथा रेशनचं धान्य होणार बंद!
e-KYC अजून केली नाही? उरले फक्त शेवटचे काही दिवस, अन्यथा रेशनचं धान्य होणार बंद!
पुणे: केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. रेशनकार्ड योजना ही यापैकीच एक आहे. या योजनेतून गरीब आणि गरजू नागरिकांना अन्नधान्य पुरवण्यात येते. सरकारने याच रेशनकार्ड धारकांसाठी ई-केवायसी अनिवार्य केली आहे. 31 मार्च 2025 ही यासाठी अंतिम मुदत असून वेळेत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या शिधापत्रिकाधारकांचं धान्य थेट बंद होणार आहे. त्यामुळे आपणही अद्याप ई-केवायसी केली नसेल तर मुदतीपूर्वी ती करून घ्यावी लागणार आहे.
दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तू गरजूंनाच मिळाव्या. त्याचा गैरवापर होऊ नये म्हणून सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रेशनकार्ड धारकांना ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. शिधापत्रिकेवरील नाव योग्य असल्याची खात्री करण्यासाठी ही प्रक्रिया असून ई-केवायसीसाठी सरकारने 31 मार्चची मुदत दिली. आता अंतिम मुदतीसाठी काहीच दिवस बाकी आहेत. त्यामुळे शिधापत्रिकेचा लाभ घेणाऱ्यांनी त्वरीत ई-केवायसी करून घ्यावी. अन्यथा लाभ बंद होण्यासोबतच शिधापत्रिकेतून नाव देखील कमी केले जाऊ शकते.
advertisement
राज्यात ई-केवायसी मोहीम
सर्वोच्च न्यायालय तसेच केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसी पडताळणी करण्याच्या सूचना यापूर्वीच राज्य सरकारला दिल्या आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व रास्त भाव दुकानांवर ई-केवायसी मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच ही कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिल्या आहेत. ही प्रलंबितता मोठी असल्याने यासाठी यापूर्वी अनेकदा मुदतवाढ दिली होती. आता मात्र 31 मार्च ही शेवटची तारीख असून त्यापूर्वीच ई-केवायसी करावी लागेल.
advertisement
ई-केवायसी कशी करायची?
आपल्या जवळच्या रेशन दुकानाला भेट द्या. पीओएस मशीनवर ओळख सत्यापित करा. दुकानात पोहोचल्यानंतर तुमचा अंगठा पीओएस मशिनवर ठेवा आणि तुमची ओळख सत्यापित करून घ्या. ई-केवायसीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करा. तुमचा अंगठा यशस्वीरित्या स्कॅन झाल्यावर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.
दरम्यान, ई-केवायसी प्रक्रियेमुळे रेशन सेवेत पारदर्शकता येणार आहे. तसेच गरजू आणि गरिबांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवणे शक्य होणार आहे. यासाठीच सरकारने हे महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे.
मराठी बातम्या/पुणे/
e-KYC अजून केली नाही? उरले फक्त शेवटचे काही दिवस, अन्यथा रेशनचं धान्य होणार बंद!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement