>> कोणत्या गोष्टींवर मिळते गोल्ड लोन?
गोल्ड लोन फक्त सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या नाण्यांवर मिळते. आरबीआयच्या नियमानुसार, गोल्ड बार, गोल्ड बिस्किट अथवा गोल्ड ईटीएफवर गोल्ड लोन दिलं जात नाही. बँका अथवा गोल्ड लोन देणाऱ्या संस्था या दागिन्यांवर कर्ज देतात.
>> किती मिळू शकते कर्ज?
कोणतीही व्यक्ती एक किलो अधिकाधिक एक किलोच सोनं गहाण ठेवू शकतो. गोल्ड लोनमध्ये तुम्हाला किती रक्कम द्यावी हे सोन्याची किमत आणि LTV च्या आधारे ठरवले जाते. अडीच लाख रुपयापर्यंतच्या कर्जावर ८५ टक्के एलटीव्ही, अडीच ते ५ लाख रुपयापर्यंतच्या कर्जावर ८८ टक्के एलटीव्ही आणि पाच लाखाहून अधिकच्या कर्जासाठी ७५ टक्के एलटीव्ही असते.
advertisement
सध्याच्या दरानुसार, आता प्रति ग्रॅम ११ हजार रुपयापर्यंत कर्ज मिळू शकते. उदाहरणार्थ, एसबीआय गोल्ड लोनची मर्यादा ही ५० लाख रुपयापर्यंत आहे. गोल्ड कॉईनवर कर्ज घेणार असाल तर एकूण वजन हे फक्त ५० ग्रॅमपर्यंत मान्य आहे.
>> बँक सोन्याचा दर कसा निश्चित करते?
गोल्ड लोन देण्याआधी बँक सोन्याची शुद्धता (कॅरेट्स) आणि सध्या च्या बाजारभावाच्या आधारे सोन्याचं मूल्य निश्चित करतात. आरबीआयनुसार, मागील ३० दिवसातील सरासरी दर अथवा आधीच्या दिवसात बाजार बंद होतानाचा दर यापैकी जे कमी असेल त्या दराला आधारभूत मूल्य मानले जाते. दागिन्यांमध्ये मौल्यवान खडे असतील तर त्याची अतिरिक्त किंमत गृहीत धरली जात नाही.
>> सोनं सुरक्षित कोण ठेवणार?
एकदा ग्राहकाने गोल्ड लोनसाठी बँकेकडे सोनं दिल्यानंतर त्याच्या सुरक्षितेची जबाबदारी ही बँकेची असते. जर सोनं गहाळ झालं, त्याचे वजन, कॅरेट्स कमी झाले तर ग्राहकाला नुकसान भरपाई दिली जाते.
>> गोल्ड लोन फेडलं पण सोनं मिळण्यास उशीर झाला तर?
ग्राहकाने गोल्ड लोन पूर्णपणे भरल्यानंतर बँकांकडून गहाण ठेवलेलं सोनं देण्यास उशीर केला जात असेल तर त्यांना ग्राहकांना पैसे द्यावे लागतील. आरबीआयच्या नियमानुसार, अशा प्रकरणामध्ये बँकांना प्रति दिन ५००० रुपये यानुसार नुकसानभरपाई द्यावी लागेल.
एकूणच गोल्ड लोन घेण्याआधीच अटी आणि नियमांना समजून घेणे आवश्यक आहे. जेणेकरुन तुम्हाला गोल्ड लोनबाबत निर्णय घेण्यास सोपं होईल.
