TRENDING:

Gold Price Prediction: पैसे तयार ठेवा, सोन्याच्या दरात येणार मोठा भूकंप! एक्सपर्टनं सांगितलं किती रुपयांनी होणार स्वस्त?

Last Updated:

Gold Price Prediction: युद्धा पेटलं असताना दुसरीकडे सोन्याचं दर वाढण्याऐवजी घसरले आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये समाधान असले तरी शॉर्ट टर्मचे गुंतवणूकदार धास्तावले आहेत. मात्र, येत्या काही दिवसात सोन्याच्या दरात मोठी घसरण होणार असल्याचा अंदाज एक्सपर्टने वर्तवला आहे.

advertisement
Gold Price: जागतिक स्तरावर युद्ध आणि तणावाचे वातावरण असताना सहसा गुंतवणूकदार सोन्याकडे सुरक्षित पर्याय म्हणून वळतात. मात्र, सध्याची परिस्थिती काहीशी वेगळी दिसत आहे. युद्धा पेटलं असताना दुसरीकडे सोन्याचं दर वाढण्याऐवजी घसरले आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये समाधान असले तरी शॉर्ट टर्मचे गुंतवणूकदार धास्तावले आहेत. मात्र, येत्या काही दिवसात सोन्याच्या दरात मोठी घसरण होणार असल्याचा अंदाज एक्सपर्टने वर्तवला आहे.
News18
News18
advertisement

अमेरिकेतील बॉण्ड यील्ड (Bond Yield) आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे सोन्याच्या भावावर मोठा दबाव निर्माण झाला असून, येत्या काळात सोन्याच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. सोन्याच्या दरात जवळपास २५ ते ३० हजार रुपयापर्यंत घसरण होण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय गणित काय सांगतं?

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव सुमारे ५००० डॉलर प्रति औंसच्या आसपास आहे, तर भारतात १० ग्रॅम सोन्याची किंमत साधारण १,६१,३९० रुपयांच्या घरात आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते, जर आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने ४२०० डॉलरपर्यंत घसरले, तर हा सुमारे १६ टक्क्यांचा मोठी घसरण झाली आहे.

advertisement

भारतात किती रुपयांनी दर कमी होणार?

जर जागतिक बाजारात १६ टक्के घसरण झाली आणि डॉलर-रुपयाचे मूल्य स्थिर राहिले, तर भारतीय बाजारातही सोन्याचे भाव १६ टक्के म्हणजेच साधारण २५,८०० रुपयांनी कमी होऊ शकतात. अशा स्थितीत भारतात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,३५,००० ते १,३७,००० रुपयांच्या दरम्यान येऊ शकतो.

सोन्याचे दर का घसरणार? एक्सपर्टने दिली कारणं...

advertisement

बॉण्ड यील्डचा प्रभाव: अमेरिकेच्या १० वर्षांच्या बॉण्डची यील्ड वाढली की गुंतवणूकदार सोन्यातून पैसे काढून बॉण्डमध्ये गुंतवतात. तिथे खात्रीशीर व्याज मिळते. सोन्यावर कोणतेही व्याज मिळत नसल्याने त्याची मागणी घटते.

कच्च्या तेलाचे संकट: आखाती देशांमधील तणावामुळे तेल महागले की जगभरात महागाई वाढते. महागाई रोखण्यासाठी बँका व्याजदर वाढवतात, ज्याचा थेट फटका सोन्याच्या किमतींना बसतो.

advertisement

डॉलरची मजबुती: सोने डॉलरमध्ये खरेदी केले जाते. डॉलर वधारला की इतर देशांसाठी सोने खरेदी महाग पडते, परिणामी मागणी कमी होऊन भाव खाली येतात.

युद्धाची दिशा: युद्ध दीर्घकाळ चालल्यास आणि आर्थिक दबाव वाढल्यास, रोख रक्कम उभी करण्यासाठी गुंतवणूकदार सोन्याची विक्री (Profit Booking) करू शकतात.

शेअर बाजारातील पडझड: मोठ्या फंडांना शेअर बाजारात नुकसान झाले, तर ते भरून काढण्यासाठी सोन्यातील आपली गुंतवणूक विकून रोख रक्कम जमा करतात, ज्यामुळे सोन्याचे दर कोसळतात.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
Gold Price Prediction: पैसे तयार ठेवा, सोन्याच्या दरात येणार मोठा भूकंप! एक्सपर्टनं सांगितलं किती रुपयांनी होणार स्वस्त?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल