TRENDING:

Jalgaon Gold Rate: अधिकमास संपताच सोनं स्वस्त! पाहा काय आहे जळगावातील सोन्याचा भाव

Last Updated:

Jalgaon Gold Rate: गेल्या महिनाभरापासून अधिकमास सुरु होता. या काळात सोन्याला मोठी मागणी असते. मात्र अधिकमास संपताच सोन्याचा भाव कमी झालाय.

advertisement
नितीन नांदुरकर, जळगाव: अधिकमासामध्ये जावयाला सोनं दानं केलं जातं. या काळात सोन्याला प्रचंड मागणी असते. नुकताच अधिकमास संपला आहे आणि हा महिना संपताच सोन्याच्या भावात घसरण पाहायला मिळतेय. गेल्या अनेक दिवसांपासून 59 ते 61 हजारांदरम्यान असलेल्या सोन्याच्या भावात घसरण होऊन ते सव्वा महिन्याच्या नीचांकीवर आले आहे. अधिक मासामुळे सोने- चांदीच्या भावात वाढ झाली होती. आता तीन दिवसांपासून सोने 58 हजार 800 रुपये प्रतितोळ्यावर (10 ग्रॅम) आहे. तर चांदीतही चढ-उतार होत आहे. सध्या चांदी 71 हजार रुपये प्रतिकिलोवर आहे.
News18
News18
advertisement

जुलै महिन्याच्या आठवड्यापासून सोन्याच्या भावात वाढ होत जाऊन ते 59 हजारांच्या पुढे होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर भाव वाढल्याने भाववाढ तर होतच होती, शिवाय अधिक मास सुरू झाल्याने सोने-चांदीला मागणी वाढली होती. त्यामुळे मध्यंतरी सोने 61 हजारांच्याही पुढे गेले. मात्र, अधिक महिना संपल्यानंतर सोन्याचे भाव कमी होऊन गेल्या तीन दिवसांपासून ते 58 हजार 800 रुपये प्रतितोळ्यावर स्थिर आहे.

advertisement

गेल्या महिन्यात 6 जुलै रोजी 58 हजार 850 रुपये प्रतितोळ्यावर असलेल्या सोन्याचे भाव अधिकमास सुरू झाल्यानंतर वाढू लागले. 13 जुलै रोजी सोने 59 हजार 700 रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले होते. त्यानंतर ते पुन्हा 19 जुलै रोजी 60 हजार 250 रुपयांवर पोहोचले. अशाच प्रकारे किरकोळ चढ-उतार सुरू राहत सोन्याचे भाव 59 हजार रुपयांच्या पुढे राहिले. मात्र, 16 ऑगस्ट रोजी 59 हजार 300 रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात अधिक मास संपताच 17 ऑगस्ट रोजी 500 रुपयांची घसरण झाली व ते 58 हजार 800 रुपये प्रतितोळ्यावर आले. यामुळेच ग्राहकाची मोठी गर्दी सराफ बाजारात दिसून येत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
Jalgaon Gold Rate: अधिकमास संपताच सोनं स्वस्त! पाहा काय आहे जळगावातील सोन्याचा भाव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल