Gold Silver Price Today : भारतीय कमोडिटी बाजारात आज सोने आणि चांदी दोन्हींच्या किमतीत विक्रमी वाढ होत आहे. सोन्याच्या दराने आज विक्रमी उच्चांक टप्पा गाठला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किमतीत प्रति 10 ग्रॅम 850 रुपयांची वाढ झाली आहे. चांदीच्या दरानेही उसळण घेतली आहे. चांदीच्या दराने प्रति किलो मागे 2500 रुपयांची उसळण घेतली.
advertisement
गुंतवणूकदारांची खरेदी आणि जागतिक बाजारपेठेतील ताकद यामुळे स्थानिक बाजारपेठेत सोनं-चांदीला मोठा आधार मिळाला आहे. आज भारतीय कमोडिटी बाजारात सोने आणि चांदी दोघांनीही चांगली कामगिरी केली.
MCX वर सोन्याने प्रति १० ग्रॅम 1,11,100 रुपयांचा टप्पा ओलांडला. चांदीच्या दरानेही 14 वर्षांचा उच्चांक गाठला. चांदीने पहिल्यांदाच प्रति किलो 1,32,250 रुपयांचा उच्चांक गाठला. जागतिक स्तरावर, यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात केल्यामुळे आणि आणखी दर कपातीच्या अपेक्षेमुळे सोनं-चांदीच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
सोन्याच्या दराने गाठला उच्चांक...
आज MCX वर सोन्याच्या किमतींनी नवा विक्रम केला. सोन्याने प्रति 10 ग्रॅम 850 रुपयांची वाढ होऊन आतापर्यंतची सर्वोच्च पातळी गाठली. अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा आणि कमकुवत डॉलर निर्देशांक यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याला मोठा आधार मिळाला. सणासुदीच्या आणि लग्नाच्या हंगामातील देशांतर्गत मागणीमुळेही या तेजीला चालना मिळत आहे.
सोन्यासोबतच चांदीनेही विक्रमी कामगिरी केली. जागतिक स्तरावर, चांदीने प्रति औंस 43.5 डॉलरपेक्षा जास्त दर गाठला. हा दर मागील 14 वर्षातील सर्वाधिक उच्चांकी दर आहे.
दरम्यान, MCX वर चांदीच्या दराने पहिल्यांदाच प्रति किलो 1,32,250 चा दर गाठला. पुरवठा कमी असल्याने आणि औद्योगिक मागणी वाढत असल्याने ही वाढ झाली असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.
चांदीच्या दरात 2500 रुपयांची वाढ...
केवळ सोनेच नाही तर चांदीच्या दरामध्येही लक्षणीय वाढ झाली. MCX वर चांदीच्या किमती प्रति किलो 2500 रुपयाने वाढली. जागतिक औद्योगिक मागणी (सौर, इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स) चांदीच्या वापरात वेगाने वाढ होत आहे. पुरवठ्यात घट झाल्याने किमतींनाही आधार मिळाला.
जागतिक घटकांचा परिणाम
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ ही यूएस फेडरल रिझर्व्हच्या व्याजदराच्या भूमिकेशी आणि महागाईच्या आकडेवारीशी जोडलेली आहे. फेडरल रिझर्व्हने अलीकडेच व्याजदरात कपात केली आहे आणि पुढील दर कपात अपेक्षित आहेत. यामुळे गुंतवणूकदार सोने आणि चांदीसारख्या सुरक्षित संपत्तीकडे वळत आहेत.
गुंतवणूकदारांच्या मागणीचा पाठिंबा
सण आणि लग्नाचा हंगाम जवळ येताच भारतात पारंपारिकपणे सोन्याची मागणी वाढते. याच काळात औद्योगिक आणि दागिन्यांचा चांदीचा वापर वाढतो. म्हणूनच देशांतर्गत बाजारात गुंतवणूकदारांकडून गुंतवणूकदारांची जोरदार खरेदी दिसून येत आहे.
जर डॉलर निर्देशांक कमकुवत झाला आणि फेडने दर आणखी कमी केले तर सोने आणि चांदीची तेजी सुरू राहू शकते असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.