लग्नसराईच्या काळात आज सोने आणि चांदीच्या किमतीत मोठा बदल दिसून आला आहे. आज मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव २०३४ रुपयांनी महाग झाला आहे. आज सोन्याचा दर हा प्रति १० ग्रॅम १, २५, ३४२ रुपयांवर पोहोचला आहे. जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा भाव प्रति १० ग्रॅम १, २९, १०२ रुपये झाला आहे. तर, चांदी जीएसटीसह १, ६१, ७२९ रुपये प्रति किलो आहे.
advertisement
आज जीएसटीशिवाय चांदीच्या दरात ३३६९ रुपयांनी वाढ झाली. आणि १,५७,०१९ रुपयांवर उघडली. सोमवारी, जीएसटीशिवाय चांदी १,५३,६५० रुपये प्रति किलो दरावर बंद झाली होती. जीएसटीशिवाय सोने १, २३, ३०८ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाले.
सोनं पुन्हा उच्चांक गाठणार?
दिवाळीच्या सुमारास सोन्याने आपला प्रति १० ग्रॅम १,३०,८७४ रुपयांचा उच्चांक गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या दरात चांगलीच घसरण झाली होती. त्यानंतर सोन्याचा दरात चढ-उतार सुरू होता.
आता सोने १७ ऑक्टोबर रोजी १३०८७४ रुपयांच्या सर्वोच्च पातळीवरून ५५३२ रुपयांनी स्वस्त झाले आहे. सोन्याच्या दरात तेजी कायम राहिल्यास सोन्याचा दर उच्चांक गाठण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर, चांदीच्या किमती १४ ऑक्टोबर रोजीच्या १,७८,१०० च्या त्यांच्या सर्वकालीन उच्चांकावरून २१,०८१ रुपयांनी घसरल्या आहेत.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) द्वारे सोने आणि चांदीच्या स्पॉट किमती जाहीर केल्या जातात. तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो. IBJA दिवसातून दोनदा दर जाहीर करते. हा एकदा दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आणि दुसरा संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास जाहीर केले जातात.
>> कॅरेटनुसार सोन्याचे दर
आज, २३ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १, २४,८४० रुपयांवर खुला झाला. आज सोन्याच्या दरात २,०२६ ने वाढले. GST सह त्याची किंमत आता १,२८,५८५ आहे. यात मेकिंग चार्जेसचा समावेश नाही.
२२ कॅरेट सोन्याची किंमत १,८६३ रुपयांनी वाढून १, १४, ८१३ प्रति १० ग्रॅम झाली आहे. GST सह १, १८, २५७ रुपये इतका दर झाला.
१८ कॅरेट सोन्याचा दर १,५२६ रुपयांनी वाढून ९४, ००७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे आणि जीएसटीसह त्याची किंमत ९६, ८२७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.
१४ कॅरेट सोन्याचा दरही १,१९० रुपयांनी वाढला आहे. आज तो ७३, ३२५ रुपयांवर उघडला आणि जीएसटीसह तो ७५, ५२४ रुपयांवर आला आहे.
या वर्षी सोने ४९, ६०२ रुपयांनी महागले आहे. दरम्यान, चांदी प्रति किलो ७१,००२ रुपयांनी महागली आहे.
