TRENDING:

लग्नासाठी किंवा गिफ्ट द्यायला आताच खरेदी करा सोनं, 10 दिवसात वाढणार किंमती?

Last Updated:

लग्नासाठी किंवा सणानिमित्त गिफ्ट देण्यासाठी सोनं खरेदी करायचं असेल तर सध्या योग्य कालखंड आहे.

advertisement
पुणे, 6 सप्टेंबर : भारतीयांचा सोनं आणि चांदीमध्ये गुंतवणूक करण्याकडं नेहमी कल असतो. ही गुंतवणूक नेहमी सुरक्षित मानली जाते. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय घटकांवर सोन्याची किंमत अवलंबून अलसते. या किंमतीमध्ये नियमित चढ-उतार होतात. लवकरच येणाऱ्या गौरी-गणपती सणाच्या काळात सोनं खरेदी करण्याची अनेकांची इच्छा आहे. या कालावधीत हे दर कसे असतील याबाबत महत्त्वाची माहिती पुण्यातल्या राका ज्वेलर्सचे ऋषभ राका यांनी दिलीय.
advertisement

गणेशोत्सवाच्या निमित्तानं सध्या सराफा बाजारात उत्साहाचं वातावरण आहे. गणेशोत्सव त्यानंतर येणाऱ्या नवरात्र तसंच दसर-दिवाळीपर्यंत ही गर्दी कायम राहण्याचा अंदाज आहे. अनेक ग्राहक शूभ मुहूर्त पाहून अ‍ॅडव्हान्स बुकिंग करतात. तसंच त्या दिवशी सोन्याची खरेदी करतात.

SBI मध्ये अकाउंट असणाऱ्यांसाठी गुडन्यूज! बँकेने ग्राहकांना दिली 'ही' डिजिटल सुविधा

ग्राहकांच्या मागणीमुळे आगामी काळात सोने तसेच चांदीचे भाव वाढणार आहेत . महाराष्ट्रमध्ये आज सोन्याचा सर्वसाधारण दर 10 ग्रॅम 24 कॅरेटसाठी 60160 रुपये तर 10 ग्रॅम 22 कॅरेटसाठी 55,150 रुपये आहे, अशी माहिती राका यांनी दिली.

advertisement

चांदीच्या भांड्यांना मागणी

गणेशोत्सवादरम्यानच महालक्ष्मीचा सण असल्याने त्या निमित्त महालक्ष्मीसाठी चांदीच्या भांड्यांची खरेदी बाजारात वाढली आहे. महालक्ष्मींसाठी चांदीच्या वाट्या, फुलपात्र, ताम्हण, ताट, तांबे, समया या खरेदीला ग्राहकांचं प्राधान्य आहे. काही ठिकाणी चांदीच्या गणेशमूर्तींनाही मागणी वाढलीय.

तुम्हीही 100 ऐवजी 110 रुपयांचं पेट्रोल टाकता का? यामुळे खरंच जास्त पेट्रोल येतं?

advertisement

गणेशोत्सव जवळ आल्यानं अनेक भाविक चांदीच्या गणेश मूर्तीची खरेदी करायला प्राधान्य देत आहेत. ही गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा करून कायमस्वरूपी घरात ठेवली जाते. सराफ बाजारातील चांदीची वेगवेगळ्या प्रकारचे दागिने ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.तसेच सराफ बाजारात महालक्ष्मीसाठी खास दागिने आले आहेत. त्यात अगदी नथ, कानातले, मंगळसूत्र यांचा समावेश आहे. या दागिन्यांनाही चांगली आहे

advertisement

सोने-चांदी दराचा उत्सवाशी संबंध?

सोन्या-चांदीचे दर सणासुदीत वाढत असतात, गणपती-गौरी किंवा दसरा-दिवाळीला सोन्याचे भाव वाढतात, असा सर्वसामान्य समज असतो. पण तज्ञांच्या मते, सण-उत्सवांचा या दरांशी काहीही संबंध नसतो. आंतरराष्ट्रीय बाजारात, शेअर बाजारातील चढ-उतारांनुसार, सराफा बाजारातील हालचालींनुसार सोन्याचे भाव कमी-जास्त होत असतात. अशी माहिती राका यांनी दिली आहे.

( टीप : बातमीतील मतं ही तज्ज्ञांची वैयक्तिक आहे. सोने-चांदीच्या दरात वेगवेगळ्या कारणांमुळे बदल होऊ शकतो. )

advertisement

मराठी बातम्या/मनी/
लग्नासाठी किंवा गिफ्ट द्यायला आताच खरेदी करा सोनं, 10 दिवसात वाढणार किंमती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल