SBI मध्ये अकाउंट असणाऱ्यांसाठी गुडन्यूज! बँकेने ग्राहकांना दिली 'ही' डिजिटल सुविधा

Last Updated:

SBI: यूपीआयला डिजिटल रुपयांसह इंटरऑपरेबल बनवण्याचा ग्राहकांना खूप फायदा होईल. त्यांना पेमेंटचा दुसरा ऑप्शन मिळेल. ग्राहक या सेवेचा लाभ eRupee by SBI अ‍ॅपद्वारे घेऊ शकतात.

एसबीआय
एसबीआय
नवी दिल्ली, 5 सप्टेंबर : देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना यूपीआयच्या माध्यमातून सेंट्रल बँक डिजिटल करेंसी म्हणजेच डिजिटल करेंसी पेमेंटची सुविधा दिली आहे. एसबीआयने यासाठी यूपीआय क्यूआर कोड स्कॅन सेवेची सुरुवात केली आहे. याला यूपीआय इंटरऑपरेबिलिटी नाव देण्यात आलंय. यासह आता कोट्यवधी लोक थेट यूपीआयच्या माध्यमातून डिजिटल रुपयांचे ट्रांझेक्शन करु शकतील. भारतातील सर्वात मोठ्या बँकेने या नवीन सेवेने डिजिटल रुपयांचा वापर वाढवण्याची आशा व्यक्त केली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने काही काळापूर्वी डिजिटल करेंसी सुरू केली होती. CBDC त्याच ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर आधारित आहे ज्यावर क्रिप्टो करेंसीज कार्य करतात. CBDC क्रिप्टो करेंसीपेक्षा वेगळे आहेत. कारण त्यांना त्याच प्रकारची सॉवरेन गॅरंटी मिळेल, जशी पेपर करेंसीला मिळालेली असते. ई-रुपी किंवा ई-रुपी वॉलेटद्वारे व्यवहार करण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. ई-रुपी वॉलेट फ्रीमध्ये उघडले जाऊ शकते आणि यामध्ये मिनिमम बॅलेन्स ठेवण्याजी गरज नाही.
advertisement
आज ही सेवा सुरू करताना, स्टेट बँकेने सांगितले की, eRupee by SBI अ‍ॅप्लिकेशनच्या या सुविधेमुळे SBI CBDC यूझर्सला जलद आणि सुरक्षित व्यवहारांसाठी कोणत्याही व्यापाऱ्याचा UPI QR कोड सहज स्कॅन करता येईल. एचडीएफसी बँक, कॅनरा बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि येस बँक यांनी ही सेवा आधीच सुरू केली आहे.
advertisement
ग्राहकांसाठी फायदेशीर
UPI ला डिजिटल रुपयासह इंटरऑपरेबल बनवल्याने ग्राहकांना खूप फायदा होईल. त्यांना पेमेंटचा दुसरा ऑप्शन मिळेल. ग्राहक या सेवेचा लाभ eRupee by SBI अ‍ॅपद्वारे घेऊ शकतात. या अ‍ॅपच्या मदतीने यूझर्स कोणत्याही दुकानात किंवा कोठेही UPI QR कोड स्कॅन करून थेट डिजिटल रूपयांसह पेमेंट करू शकतात. CBDC ला UPI सह इंटीग्रेट केल्याने लोकांमध्ये डिजिटल करेंसीचा वापर वाढेल.
advertisement
गेल्या अर्थसंकल्पात त्याची घोषणा करण्यात आली होती
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022-23 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात CBDC सुरू करण्याची घोषणा केली होती. भारतीय रिझर्व्ह बँकेने 1 डिसेंबर 2022 पासून सेंट्रल बँक डिजिटल चलनाची चाचणी सुरू केली. सध्या, खाजगी क्षेत्रातील बँकांसह, जवळजवळ सर्व प्रमुख बँका CBDC मध्ये सामील झाल्या आहेत. एसबीआय यामध्ये सामील होणे विशेष आहे कारण ही बँक ग्राहकांची संख्या, ब्रांचची संख्या आणि दुर्गम भागात पोहोचण्याच्या बाबतीत इतर सर्व बँकांपेक्षा खूप पुढे आहे.
मराठी बातम्या/मनी/
SBI मध्ये अकाउंट असणाऱ्यांसाठी गुडन्यूज! बँकेने ग्राहकांना दिली 'ही' डिजिटल सुविधा
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement