TRENDING:

Yes Bank Acquired: भारतीय बँकिंग क्षेत्रातील ऐतिहासिक व्यवहार, बँकेचा मालक बदलला; जपान SMBCने 8,889 कोटी मोजले

Last Updated:

Yes Bank Acquired: भारतीय बँकिंग क्षेत्रात ऐतिहासिक व्यवहार झाला आहे. Yes Bankवरील ताबा आता जपानी बँक SMBCकडे गेला असून त्यांनी तब्बल 8,889 कोटी मोजले आहेत.

advertisement
News18
News18
advertisement

मुंबई: येस बँकेमध्ये (Yes Bank) मोठा बदल झाला आहे. जपानची सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशन (SMBC) या बँकेने भारतीय स्टेट बँक (SBI) आणि इतर काही बँकांकडून येस बँकेतील 20% हिस्सा खरेदी करण्याचा करार पूर्ण केला आहे. या करारामुळे एसएमबीसी (SMBC) आता येस बँकेतील सर्वात मोठी भागधारक बनली आहे. मात्र या करारानंतरही एसबीआयचा हिस्सा 10% पेक्षा अधिकच राहील.

advertisement

8,889 कोटी रुपयांचा ऐतिहासिक व्यवहार

हा करार सुमारे 8,889 कोटी रुपयांचा असून याला भारतीय खासगी बँकिंग क्षेत्रात झालेली आतापर्यंतची सर्वात मोठी परदेशी गुंतवणूक मानले जात आहे. ही गुंतवणूक केवळ येस बँकेसाठीच नव्हे तर भारत आणि जपानमधील व्यावसायिक संबंधांसाठीही महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

advertisement

संचालक मंडळावर जपानी प्रतिनिधी

या करारामुळे एसएमबीसीला येस बँकेच्या संचालक मंडळावर (Board) दोन जागा मिळाल्या आहेत. त्यानुसार शिनीचिरो निशिनो (Shinichiro Nishino) आणि राजीव वीरवल्ली कन्नन (Rajeev Veervalli Kannan) यांची नवीन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे बँकेची प्रशासन व्यवस्था (Governance) अधिक मजबूत होईल आणि दोन्ही संस्थांमधील धोरणात्मक सहकार्य अधिक वाढेल, असा विश्वास बँकेने व्यक्त केला आहे.

advertisement

येस बँक आता एसएमबीसीच्या अनुभवाचा आणि जागतिक नेटवर्कचा वापर करून भारत आणि जपानमधील व्यवसाय आणि गुंतवणूक अधिक वेगाने वाढवण्याची तयारी करत आहे. विशेषतः कॉर्पोरेट बँकिंग, ट्रेजरी सेवा आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारांच्या क्षेत्रात आपली उपस्थिती वाढवण्यावर बँकेचे लक्ष असेल. येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ प्रशांत कुमार यांनी सांगितले की, हा करार बँकेसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि यामुळे दीर्घकाळासाठी भागधारकांना फायदा होईल.

advertisement

पतमानांकन (Credit Rating) मध्ये सुधारणा

या करारामुळे येस बँकेला रेटिंग एजन्सींकडूनही दिलासा मिळाला आहे. CRISIL, ICRA, India Ratings आणि CARE या रेटिंग एजन्सींनी बँकेचे रेटिंग AA- पर्यंत वाढवले आहे. मार्च 2020 नंतर हे सर्वात उच्च रेटिंग आहे. यामुळे बँकेची आर्थिक स्थिती, प्रशासन आणि व्यावसायिक कामगिरी गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या सुधारली असल्याचे दिसून येते.

शेअरच्या कामगिरीवर परिणाम

जपानी बँकेने मोठा हिस्सा खरेदी करूनही आणि क्रेडिट रेटिंगमध्ये सुधारणा होऊनही, येस बँकेच्या शेअरमध्ये आज घसरण दिसून आली. एनएसईवर येस बँक 0.43% ने घसरून 21.06 रुपयांवर बंद झाला. तरीही गेल्या एका महिन्यात या शेअरने 10% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. गेल्या एका वर्षात यात 10% ची घसरण झाली असली तरी दीर्घकाळात म्हणजेच गेल्या पाच वर्षांत या शेअरने गुंतवणूकदारांना 50% पेक्षा जास्त फायदा दिला आहे.

मराठी बातम्या/मनी/
Yes Bank Acquired: भारतीय बँकिंग क्षेत्रातील ऐतिहासिक व्यवहार, बँकेचा मालक बदलला; जपान SMBCने 8,889 कोटी मोजले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल