बरेचदा तुम्ही 5,000 ते 10,000 रुपयांची मासिक एसआयपी सुरू करतात आणि अचानक तुमच्यासमोर अशी स्थिती निर्माण झाली की, तुम्हाला एसआयपी चालू ठेवणे कठीण होतं. मग आता अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल? अशा वेळी, तुमच्याकडे दोन पर्याय असतात. एकतर तुम्ही SIP बंद करु शकता आणि पैसे काढू शकता. तर दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही SIP काही काळ पॉज करु शकता आणि परिस्थिती चांगली झाल्यास एसआयपी पुन्हा सुरु करु शकता. पण अशावेळी बेस्ट ऑप्शन कोणता याविषयी आज आपण जाणून घेऊया.
advertisement
प्रधानमंत्री आवास योजनेची महत्त्वाची सूचना, अजिबात करु नका या 3 चुका!
SIP पॉज करण्याचा अर्थ काय?
आर्थिक अडचणीमध्ये तुम्ही ही सुविधा वापरु शकता. तुम्ही काही काळासाठी तुमची योजना ही पॉझ करु शकता म्हणजेच थांबवू शकता. यापूर्वी 1 ते 3 महिन्यांसाठी ही सुविधा दिली जात होती, परंतु आता काही फंड हाऊसने हा कालावधी सहा महिने केलाय. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ॲसेट मॅनेजमेंट कंपनी म्हणजेच AMC ला 'पॉज' करण्याची विनंती सबमिट करावी लागेल. विनंती करताना, तुम्हाला तुमची कंपनी किती दिवस पॉज सुविधा देते हे देखील चेक करुन घ्यावं लागेल. कंपनीने तुमची विनंती मान्य केल्यास, ठराविक काळासाठी तुमच्याकडून SIP हप्ता आकारला जाणार नाही. मात्र 'विराम' कालावधी संपला की SIP हप्ता आपोआप तुमच्या अकाउंटमधून कट करण्यात येईल.
एसआयपी पॉज कधी निवडावं?
तुम्हाला मेडिकल इमरर्जेन्सी आली असेल, नोकरी गमावली असेल किंवा अचानक मोठा खर्च आला किंवा लग्न, घर खरेदी किंवा इतर कोणत्याही कौटुंबिक गोष्टींमुळे तुमच्यावरील आर्थिक भार वाढला असेल यामुळे तुम्ही त्या काळात हप्ते भरु शकत नसाल. पण काही काळाने तुम्ही ते पुन्हा भरु शकत असाल तर एसआयपी पॉज करु शकता. नंतर पुन्हा तुम्ही हप्ते सुरु करु शकता.
'या' कारणाने तुमचे 1 कोटी होतील अवघे 17 लाख रुपये, आताच करा नियोजन
एसआयपी कधी बंद करावी?
परंतु जर आर्थिक संकट असे असेल की तुमची परिस्थिती कधी सामान्य होईल याची तुम्हाला कल्पना नसेल, तरच तुम्ही SIP बंद करण्याचा निर्णय घेऊ शकता.
SIP मध्येच बंद केल्यानंतर, तुम्हाला तुमचे ध्येय साध्य होण्याची कोणतीही आशा नसते. परंतु SIP ला पॉज केल्यास, तुम्हाला काही दिवस हप्ते भरण्यापासून आराम मिळतो आणि त्याचा तुमच्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टावर परिणाम होत नाही. पॉज कालावधीनंतर बाजारातील भावना सुधारली तर तुम्हाला त्याचा पूर्ण फायदाही मिळू शकेल. याचं उत्तम उदाहरण कोविड काळात लोकांना पाहायला मिळालंय. त्या काळात आर्थिक संकटामुळे अनेकांनी पॉज सुविधेचा लाभ घेतला आणि नंतर ती पुन्हा सुरू केली. कोविड 19 नंतर जेव्हा बाजार सावरायला लागला तेव्हा त्यांना त्याचा प्रचंड फायदा झाला.