प्रधानमंत्री आवास योजनेची महत्त्वाची सूचना, अजिबात करु नका या 3 चुका!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Pradhan Mantri Awas Yojana : देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारच्या वतीने विविध योजना राबवल्या जातात. पंतप्रधान घरकुल योजना (पीएमएवाय) ही भारत सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे.
नवी दिल्ली: देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारच्या वतीने विविध योजना राबवल्या जातात. पंतप्रधान घरकुल योजना (पीएमएवाय) ही भारत सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. 2022 पर्यंत सर्व भारतीयांना स्वतःचं घर उपलब्ध करून देणं, हा योजनेचा उद्देश आहे. या योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी सादर झालेल्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. योजनेंतर्गत, शहरी आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना घरबांधणीसाठी सरकारच्या वतीने आर्थिक मदत दिली जाते. पण, या योजनेतील लाभार्थींनी सरकारने घालून दिलेल्या काही महत्त्वाच्या अटींचं पालन केलं नाही तर सरकार या योजनेंतर्गत दिलेली अनुदानाची (सबसिडी ) रक्कम परत घेऊ शकतं. अनेकांना याबाबत माहिती नाही.
घराचं बांधकाम अर्धवट सोडणं: जेव्हा तुम्ही घर बांधण्याची किंवा खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण करता तेव्हा पीएमएवायअंतर्गत सबसिडीचा लाभ होतो. लाभार्थ्याने कोणत्याही कारणास्तव घरबांधणीचं काम थांबवल्यास किंवा ते अर्धवट ठेवल्यास अनुदान काढून घेण्याचा अधिकार सरकारकडे आहे. ज्यांना खरोखर घर बांधायचं किंवा खरेदी करायचं आहे अशा लोकांनाच या योजनेचा लाभ मिळावा, हा मागील उद्देश आहे. अपूर्ण बांधकामामुळे सरकारने ज्या हेतूने सबसिडी दिली आहे त्याबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण होतं आणि ते नियमांचे उल्लंघन मानलं जातं. त्यामुळे घराचं बांधकाम वेळेत पूर्ण होईल याची काळजी घेतली पाहिजे.
advertisement
कर्जाची थकबाकी नसावी: लाभार्थ्याने बँक किंवा वित्तीय संस्थेकडून घेतलेल्या होम लोनची नियमित परतफेड केलेली असेल तरच पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ मिळू शकतो. लाभार्थ्याने कर्जाचे हप्ते वेळेवर न भरल्यास किंवा थकबाकी न भरल्यास, सरकार अनुदान परत घेऊ शकतं. कर्जाची थकबाकी असल्याने तुमचा क्रेडिट स्कोअर तर खराब होईलच शिवाय पंतप्रधान घरकुल योजनेची सबसिडी देखील गमवावी लागू शकते.
advertisement
घर रिकामं ठेवणं किंवा भाड्याने देणं: गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना राहण्यासाठी स्वत:चं घर मिळावं, हा पंतप्रधान घरकुल योजनेचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत अनुदान मिळाल्यानंतर एखाद्या लाभार्थ्याने घर खरेदी केलं आणि त्यात स्वत: न राहता भाड्याने दिलं तर हा या योजनेचा गैरवापर मानला जातो. अशा परिस्थितीत सबसिडी परत घेतली जाऊ शकते. लाभार्थ्याने स्वतः घरात राहणे बंधनकारक आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 20, 2024 6:37 PM IST