TRENDING:

धोकादायक स्टॉकने गुंतवणूकदारांचे नशीब बदलले, एका वर्षात करोडोंची कमाई, LIC पैसे गुंतवण्याचा मोह आवरला नाही

Last Updated:

Penny Stock: कोठारी इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन लिमिटेड या पेनी स्टॉकने अवघ्या एका वर्षात 8,492% वाढ करून गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. 2 एप्रिल 2024 रोजी अवघ्या 1.82 रुपये असलेला हा शेअर आता 162.40 रुपयेच्या उच्चांकावर पोहोचला आहे. या शेअरच्या वाढीने बाजारात मोठी चर्चा सुरू झाली असून गुंतवणूकदारांचे लक्ष त्याच्याकडे वेधले आहे.

advertisement
मुंबई: शेअर बाजारात पेनी स्टॉक्सना नेहमीच धोकादायक मानले जाते. मात्र, योग्य वेळी योग्य निवड केली तर हे स्टॉक्स गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याची संधी देऊ शकतात. याचंच उदाहरण म्हणजे कोठारी इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन लिमिटेड हा पेनी स्टॉक, ज्याने अवघ्या एका वर्षात गुंतवणूकदारांची नशिब पालटले. या मल्टीबॅगर स्टॉकने गेल्या एका वर्षात 8,492% इतकी विक्रमी वाढ केली आहे.
News18
News18
advertisement

शेअरच्या किंमतीत विक्रमी वाढ

सोमवारी कोठारी इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनचा शेअर सुमारे 2% वाढीसह 162.40 रुपये या त्याच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर व्यवहार करत होता. मागील वर्षी 2 एप्रिल रोजी हा शेअर केवळ 1.82 रुपये होता. एका वर्षाच्या आतच या स्टॉकने गुंतवणूकदारांना भलीमोठी कमाई करून दिली आहे.

गुंतवणुकीसाठी जोखीम आणि ईएसएम वर्गवारी

कोठारी इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या स्टॉकला बीएसईच्या एन्हॅन्स्ड सर्व्हिलान्स मेजर (ESM) स्टेज 2 मध्ये ठेवण्यात आले आहे. जो स्टॉक एक्सचेंज आणि सेबीने संभाव्य हेराफेरी किंवा अस्थिरता असलेल्या शेअर्सवर लक्ष ठेवण्यासाठी तयार केला आहे.

advertisement

मुंबई विमानतळावरील धक्कादायक प्रकार, शौचालयात सापडले 2.53 कोटींचे घबाड

अल्पावधीत जबरदस्त परतावा

3 महिन्यांत: 115.47% वाढ

6 महिन्यांत: 602% परतावा

2025 मध्ये आतापर्यंत: 91% वाढ

गेल्या 1 महिन्यात: 32% वाढ

या स्टॉकने सततच्या वाढीमुळे गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे.

 तेजीचे संकेत

कोठारी इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनचा रिलेटिव स्ट्रेंथ इंडेक्स (RSI) 84.5 वर आहे, जो याला मजबूत ओवरबॉट झोनमध्ये ठेवतो. याशिवाय, हा स्टॉक 10, 20, 30, 50, 100, 150 आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजच्या वर व्यवहार करत आहे, याचा अर्थ त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

advertisement

गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास

-डिसेंबर 2024 तिमाहीत किरकोळ गुंतवणूकदारांची हिस्सेदारी 53% झाली, जी सप्टेंबर 2024 मध्ये 41.3% होती.

- LIC कडे 1.89% हिस्सेदारी आहे.

-प्रमोटर्सकडे 44.1% मालकी आहे.

कोठारी इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत 

-खते उत्पादन आणि वितरण

-ड्रोन सेवा आणि तंत्रज्ञान

-हॉटेल व्यवसाय

-चमडा आणि बूट उत्पादन व्यवसाय

-दक्षिण भारतात कंपनीचा मजबूत वितरण जाळा आहे आणि बाजारात तिची चांगली ब्रँड व्हॅल्यू आहे.

advertisement

शेअर बाजारातील गुंतवणूक,जोखमीची जाणीव आवश्यक

शेअर बाजारातील गुंतवणूक धोका पत्करून केली जाते. कोठारी इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन लिमिटेडचा शेअर सध्या जबरदस्त वाढ दर्शवत असला तरी, कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

(टीप: ही माहिती फक्त शेअरच्या कामगिरीच्या आधारे दिली आहे. गुंतवणुकीपूर्वी योग्य सल्ला घ्यावा. संभाव्य तोट्यासाठी News18marathiची जबाबदार राहणार नाही.)

advertisement

मराठी बातम्या/मनी/
धोकादायक स्टॉकने गुंतवणूकदारांचे नशीब बदलले, एका वर्षात करोडोंची कमाई, LIC पैसे गुंतवण्याचा मोह आवरला नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल