आजच्या अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या नव्या कर रचनेमुळे मध्यमवर्ग आणि नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अ र्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात म्हटले की सरकारचा उद्देश्य हा कर रचना अधिक सरळ करणे आणि करदात्यांना प्रोत्साहन देणे आहे. सरकारने मध्यमवर्गाला विशेष लक्ष देऊन कराबाबत निर्णय घेतला आहे.
करात किती रुपयांची बचत?
advertisement
| उत्पन्न | बचत (रुपये) |
| 9 लाख | 40,000 |
| 10 लाख | 50,000 |
| 11 लाख | 65000 |
| 12 लाख | 80,000 |
| 16 लाख | 50,000 |
| 18 लाख | 70,000 |
| 20 लाख | 90,000 |
| 25 लाख | 1.1 लाख |
नव्या कर प्रणालीमुळे मध्यमवर्गीयांवरील कराचा बोझा काही प्रमाणात कमी होणार आहे. त्यामुळे त्यांच्या हातात अधिक पैसे राहतील, ज्यामुळे देशांतर्गत विक्री वाढणार. त्याशिवाय, गुंतवणूक आणि बचतही मोठ्या प्रमाणावर वाढेल असा अंदाज आहे. करदात्यांच्या फायद्यासाठी कर स्लॅब आणि दरांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात मध्यमवर्ग, नोकरदारांना दिलासा दिला आहे. 12 लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न आता करमुक्त असणार आहे. आतापर्यंत 7 लाख रुपयांपर्यंत कोणताही कर भरावा लागत नव्हता. आता नव्या घोषणेनंतर 12 लाख उत्पन्न असणाऱ्यांचे दरवर्षी ८० हजार रुपये वाचणार आहेत. 25 लाख रुपयांचे उत्पन्न असणाऱ्यांना पूर्वीच्या तुलनेत १० हजारांचा फायदा होणार आहे.
नवी कर रचना कशी?
नवीन करप्रणालीमध्ये, 0 ते 4 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर कोणताही कर लागणार नाही. 4 ते 8 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के कर आकारला जाईल. 8 लाख ते 12 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 10 टक्के, 16 लाख ते 20 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 20 टक्के, 20 लाख ते 24 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 25 टक्के आणि 24 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के कर आकारला जाईल.
