केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात मध्यमवर्ग, नोकरदारांना दिलासा दिला आहे. 12 लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न आता करमुक्त असणार आहे. आतापर्यंत 7 लाख रुपयांपर्यंत कोणताही कर भरावा लागत नव्हता. आता नव्या घोषणेनंतर 12 लाख उत्पन्न असणाऱ्यांचे दरवर्षी 80 हजार रुपये वाचणार आहेत. 25 लाख रुपयांचे उत्पन्न असणाऱ्यांना पूर्वीच्या तुलनेत १० हजारांचा फायदा होणार आहे.
advertisement
नवी कर रचना कशी?
नवीन करप्रणालीमध्ये, 0 ते 4 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर कोणताही कर लागणार नाही. 4 ते 8 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के कर आकारला जाईल. 8 लाख ते 12 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 10 टक्के, 16 लाख ते 20 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 20 टक्के, 20 लाख ते 24 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 25 टक्के आणि 24 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के कर आकारला जाईल.
New Tax Slab
ज्येष्ठांनाही दिलासा....
अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी ज्येष्ठ नागरिकांनाही दिलासा दिला आहे. ज्येष्ठ नागरिकांना व्याज दरावरील सवलत 1 लाख रुपयापर्यंत केली आहे.
