खरंतर एका रेडवर आधारित बनली होती प्रसिद्ध हिंदी फिल्म ‘रेड’. ही घटना खरी होती आणि ती भारतातील सर्वात मोठी इनकम टॅक्स रेड म्हणून ओळखली जाते. या आधी कधीही एखाद्या व्यापाऱ्यावर एवढी मोठी रेड झालेली नव्हती किंवा कोणाकडून ही एवढी मोठी रक्कम जप्त करण्यात आली नव्हती.
16 जुलै 1981 रोजी उत्तर प्रदेशमधील कानपूर येथील व्यापारी सरदार इंदर सिंह यांच्या घरावर ही रेड पडली. सरदार इंदर सिंह हे कानपूरमधील प्रसिद्ध व्यापारी आणि माजी राज्यसभा सदस्य होते. १९२८ मध्ये इंदरसिंग यांनी सिंग इंजिनिअरिंग वर्क्स स्थापन केले, जे भारतातील पहिले स्टील री-रोलिंग मिल होते. शिवाय त्यांनी उत्तर भारतात सर्वात मोठा रेल्वे वॅगन कारखाना, सिंह वॅगन फॅक्टरी स्थापन केला आणि भारतीय रेल्वेसाठी टाय बारचे मुख्य सप्लायरही होते.
advertisement
इनकम टॅक्सच्या 90 पेक्षा जास्त ऑफिसर आणि 200 पोलिसांचा संघ सरदार इंदर सिंहांच्या घरावर गेला. ही रेड जवळपास एका महिन्यापर्यंत चालली होती.
त्यांच्याकडे मिळालेल्या पैशांची मोजणी करण्यासाठी 45 लोकांची टीम एका वेगळ्या खोलीत बसवण्यात आली. पैसा इतका जास्त होता की त्याची मोजणी करण्यास सुमारे 18 तास लागले. हे तर रोख रकमेबद्दल होतं. दागिने आणि इतर गोष्टींचा तर हिशोबच वेगळा आहे.
या रेडमध्ये फक्त रोकडच नव्हे, तर 750 तोळं सोनं देखील जप्त झालं. यामध्ये 2 सोन्याच्या विटा होत्या. तर सुमारे ८ लाख रुपये किमतीची दागिने
सरदार इंदर सिंहांच्या पत्नी मोहिंदर कौर यांच्या घरातूनही 500 तोळे सोने, 2 विटा आणि 144 सोन्याच्या नाणी जप्त करण्यात आले आहेत. 6,977 ग्रॅम वजनाचे होते. ही सर्व संपत्ती गोल्ड (कंट्रोल) अॅक्ट, 1967 च्या उल्लंघनाच्या अंतर्गत आली.
रेडनंतर काय झालं?
या रेडनंतर आयकर विभागाने सरदार इंदर सिंह, त्यांची पत्नी मोहिंदर कौर, चार मुले, दोन सुन आणि इतर कुटुंबीयांवर नोटीस जारी केली. सरदार इंदर सिंहांच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला, पण त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने कायदेशीर लढा सुरू ठेवला.
मोहिंदर कौर यांच्या विरोधात गोल्ड (कंट्रोल) अॅक्ट, 1968 च्या उल्लंघनासाठी केंद्रीय उत्पाद शुल्क विभागाने कारवाई केली. या रेडची प्रचंडता इतकी होती की त्यावर चित्रपटदेखील बनला.