अमेरिकेतील कॅलिफोर्नियात फेसबुकसोबत काम करण्याच्या अनुभवाबाबत बोलताना राहुल म्हणाला की, नोकरी करताना अस्वस्थ वाटायचं, चिडचिड व्हायची. १०० डॉलरचं बिल मोजण्यापर्यंतचा माझा प्रवास सोपा नव्हता. फेसबुक जॉइन केल्यानंतर पहिल्या सहा महिन्यांपर्यंत खूप टेन्शन असायचं. एक सिनियर इंजिनियर म्हणून मला विचित्र वाटत होतं. कंपनीची संस्कृती आणि टूलिंग आत्मसात करण्यासाठी संघर्ष करावा लागला.
advertisement
कामात कोणाची मदत मागायचं म्हणलं तरी शक्य व्हायचं नाही. वाटायचं कंपनी अशा व्यक्तीला बाहेर काढेल जो सिनियर इंजिनिअर होण्याच्या पात्रतेचा नाही. कंपनी जॉइन केल्यानंतर फेसबुकचासुद्धा संघर्ष सुरू होता. शेअर्स खाली येत होते आणि मला एकच वर्ष झालेलं. त्यामुळे इतक्या मोठा जहाजावरून उडी मारणं घाई ठरेल असं वाटलं. त्याऐवजी मी कामावर लक्ष द्यायला सुरु केलं असंही राहुल म्हणाला.
17 वर्षांच्या मुलीला मिळाली 300 कोटींची कंपनी, असं काही केलं की, 8000 कोटींपर्यंत पोहोचला बिझनेस
दोन वर्षात राहुलने आपली कल्पकता दाखवायला सुरुवात केली. त्याने फेसबुकमध्ये एक जबरदस्त असं टूल तयार केलं. कंपनीच्या लोकांनीही ते स्वीकारलं. यामुळे इंजिनिअर्सच्या वेळेत बचत झाल्याचं राहुल सांगतो. नोकरी सोडल्यानंतर राहुलने स्वत:चा स्टार्टअप सुरू केला. त्याचं नाव Taro असं ठेवलंय. या मााध्यमातून इतर सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना आपल्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी मदत केली जाते.
राहुलच्या कामावर खूश होत कंपनीने त्याचं प्रमोशन केलं. त्याला मूळ वेतनाशिवाय दोन कोटी इक्विटी मिळाली. इक्विटीची रक्कम दोन कोटी होती. दरम्यान, कोरोना काळात राहुलने पर्याय शोधायला सुरुवात केली होती. राहुल म्हणाला की, माझ्ययाकडे माझं काम पूर्ण करण्यासाठी फक्त तांत्रिक ज्ञान होतं असं नाही तर प्रोजेक्ट्सचं नेतृत्व करण्याचं व्हिजनसुद्धा होतं. एक सिनियर इंजिनिअर आणि त्या पुढे प्रमुख इंजिनिअर होण्याचा हा एक महत्त्वाचा भाग असल्याचं राहुलने सांगितलं.