TRENDING:

Investment Tips: कमी गुंतवणूक आणि जास्त रिटर्नसाठी हवेय ना? मग 'हे' पर्याय ठरतील फायदेशीर

Last Updated:

इंडेक्स फंड ही कमी किमतीची गुंतवणूक मानली जाते. जर तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास संकोच करत असाल, किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची निवड करू शकत नसाल, तर तुमच्यासाठी इंडेक्स फंड हा एक चांगला पर्याय असू शकतो.

advertisement
मुंबई : भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी गुंतवणूक खूप महत्त्वाची आहे. सहसा लोक FD मध्ये एकरकमी रक्कम गुंतवतात. ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. लॉक-इन कालावधी संपल्यानंतर, त्यात विशिष्ट व्याज जोडले जाते. परंतु आजच्या काळात, तुमच्याकडे FD व्यतिरिक्त बरेच पर्याय आहेत, जेथे तुम्ही गुंतवणूक केल्यास FD पेक्षा चांगले परतावा मिळू शकतात.
इनव्हेस्टमेंट्स टिप्स
इनव्हेस्टमेंट्स टिप्स
advertisement

रिअल इस्टेट इवेस्टमेंट ट्रस्ट

तुमच्याकडे 2 ते 5 लाख किंवा त्याहून अधिक रक्कम असल्यास आणि त्यासाठी चांगली गुंतवणूक योजना शोधत असल्यास रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (REIT) मध्ये गुंतवणूक करु शकता. हे एक प्रकारे म्युच्युअल फंडासारखेच आहे, परंतु यामध्ये तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याऐवजी प्रॉपर्टीवर पैसे गुंतवता. ज्यांच्याकडे व्यावसायिक मालमत्ता आहे अशा कंपन्यांमध्ये ही गुंतवणूक असते. यामध्ये सर्वसामान्यांकडून पैसे घेऊन मॉल्स, बिझनेस पार्क आदी मोठ्या मालमत्ता खरेदी केल्या जातात. REIT मध्ये गुंतवणूक करण्यासाठी, तुमच्याकडे फक्त डीमॅट खाते आणि ट्रेडिंग खाते असणे आवश्यक आहे. युनिट धारक म्हणून, तुम्हाला लाभांश आणि REITच्या वाढीव मूल्याच्या रूपात कमाई होईल. परंतु ते खरेदी करताना, मूळ मालमत्ता चांगली असली पाहिजे, तरच तुम्हाला फायदा मिळेल.

advertisement

PPF Account: वयाच्या 21 व्या वर्षी PPF अकाउंट उघडू शकता का? वाचा काय सांगतो नियम

इंडेक्स फंड

इंडेक्स फंड मार्केट इंडेक्सचा मागोवा घेतो, त्याचे रिटर्न्स देखील जवळपास इंडेक्सने ऑफर केलेल्या सारखेच असतात. यामध्ये कमी जोखीम घेऊन जास्त परताव्याचा लाभ घेता येतो. इंडेक्स फंड ही कमी किमतीची गुंतवणूक मानली जाते. जर तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास संकोच करत असाल, किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची निवड करू शकत नसाल, तर तुमच्यासाठी इंडेक्स फंड हा एक चांगला पर्याय असू शकतो. याशिवाय, जर तुम्हाला एसआयपीमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर इंडेक्स फंडांमध्येही एसआयपी करता येते. इंडेक्स फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही हाउस ऑफ फंड्सची अधिकृत वेबसाइट किंवा कोणतेही अॅप वापरू शकता.

advertisement

Tree Farming: या एक किलो लाकडाच्या किंमतीत येईल मारुती बलेनो, 1 झाडातून होते 7 कोटींची कमाई! भारतात लागवत करता येते का?

सॉव्हरेन गोल्ड बाँड

सॉव्हरेन गोल्ड बाँडमध्ये तुम्ही एक ग्रॅम सोने खरेदी करून गुंतवणूक सुरू करू शकतात. हे एक प्रकारे 999 शुद्धतेचे सोने डिजिटल पद्धतीने खरेदी करण्यासारखे आहे. त्याचा लॉक इन कालावधी 8 वर्षांचा आहे. 8 वर्षांनंतर पैसे काढण्यावर कोणताही कॅपिटल गेन टॅक्स लागत नाही. परंतु याआधी पैसे काढल्यास तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल. यामध्ये, गुंतवणूकदाराला वार्षिक 2.5% व्याज मिळते, जे सहामाही आधारावर दिले जाते. तेही जीएसटीच्या कक्षेबाहेर आहे. यामध्ये आठ वर्षांत गुंतवलेल्या रकमेवर 20% व्याज मिळू शकते. पैसे काढल्यावर, सोन्याच्या बाजारभावाच्या आधारे पेमेंट केले जाते आणि यामध्ये तुम्हाला सोन्याच्या किमतीतील वाढीचा फायदा देखील मिळतो.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
Investment Tips: कमी गुंतवणूक आणि जास्त रिटर्नसाठी हवेय ना? मग 'हे' पर्याय ठरतील फायदेशीर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल