PPF Account: वयाच्या 21 व्या वर्षी PPF अकाउंट उघडू शकता का? वाचा काय सांगतो नियम

Last Updated:

PPF खातं कोण सुरू करू शकतं? त्याचे फायदे आणि अकाउंटसाठी लागणारी कागदपत्रं कोणती?

पीपीएफ अकाउंट
पीपीएफ अकाउंट
मुंबई: आपलं जेवढं उत्पन्न असतं, त्यातून खर्च वगळता काही रक्कम उरते तिची भविष्यासाठी गुंतवणूक केली जाते. गुंतवणुकीसाठी आपण अनेक पर्यायांची चाचपणी करतो आणि निर्णय घेतो. यात गुंतवणूक करताना सर्वांत महत्त्वाचं असते ती म्हणजे आपल्या गुंतवणुकीची सुरक्षितता आणि त्यातून मिळणाऱ्या परताव्याची हमी. त्यामुळे विचार करून योग्य गुंतवणूक केली तर त्यातून मिळणारा फायदा मोठा असतो. गुंतवणुकीसाठी एक सुरक्षित व चांगला पर्याय पीपीएफचा आहे. पीपीएफ म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड होय.
पीपीएफमध्ये चांगल्या व्याज दरासह कर सूटदेखील दिली जाते. त्यात थोडी रक्कम जमा करून मोठी रक्कम जमा करता येते. PPF मध्ये गुंतवणुकीची मुदत 15 वर्षांपर्यंत आहे. त्यानंतर हा कालावधी पाच वर्षांसाठी वाढवता येऊ शकतो.
पीपीएफ खातं कोण उघडू शकतं?
भारतीय नागरिकत्व असलेली व्यक्ती पीपीएफ अकाउंट उघडू शकते. भारतीय नागरिक कालांतराने परदेशात राहत असतील, तर तेही त्यांचं अकाउंट 15 वर्षांचा कालावधी पूर्ण होईपर्यंत सांभाळू शकतात.
advertisement
PPF खातं उघडण्यासाठी किमान वयाची कोणतीही अट नाही. 18 वर्षाखालील अल्पवयीन मुलांची खाती त्यांचे पालक उघडू शकतात. प्रत्येक व्यक्ती आपल्या नावाने केवळ एक पीपीएफ अकाउंट उघडू शकते. अल्पवयीन मुलांच्या पालकांशिवाय इतर कुणीही त्यांच्या नावाने अकाउंट उघडू शकत नाही. कायद्याने मूल दत्तक घेतलं असेल तर पालक खातं उघडू शकतात. एका वर्षात PPF खात्यात किमान 500 आणि जास्तीतजास्त 1.5 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात.
advertisement
पीपीएफ अकाउंट उघडण्याचे फायदे
- पीपीएफवर सध्या 7.1% व्याज दिलं जातं, हे इतर योजनांपेक्षा चांगलं आहे.
- या योजनेतील गुंतवणुकीवर मिळणारं व्याज पूर्णपणे करमुक्त आहे.
- PPF खातं मॅनेज करणं खूप सोपं आहे, त्यात गुंतवणूक करणारी व्यक्ती दरवर्षी किमान 500 रुपये आणि जास्तीतजास्त दीड लाख जमा करू शकते. ही रक्कम एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये जमा करता येते.
advertisement
- या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या मागास घटक पैशांची गुंतवणूक करू शकतात. कारण यात एका महिन्यात 50 रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करता येते.
- Public Provident Fund (Amended) Scheme 2016 नुसार, खातेदार कोणत्याही गंभीर आजाराच्या उपचारांसाठी आणि उच्च शिक्षणासाठी 1% दंडासह PPF खात्यात जमा केलेले पैसे काढू शकतात अशी तरतूद करण्यात आली आहे.
advertisement
- महत्त्वाचं म्हणजे पीपीएफच्या आधारे बँकांकडून कर्ज मिळू शकतं.
पीपीएफ अकाउंट उघडण्यासाठी कोणती कागदपत्रं लागतात?
पीपीएफ खातं उघडण्याचा फॉर्म, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड यापैकी कोणतंही ओळखपत्र, वीज बिल, टेलिफोन बिल, आधार कार्ड, रेशन कार्ड यापैकी रहिवासाच्या पत्त्याचा पुरावा देणारं कोणतंही कागदपत्रं, पासपोर्ट साइझ फोटो, PPF खात्यात रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी बँकेच्या शाखेत पे-इन-स्लिप किंवा सही केलेला चेक आणि अल्पवयीन मुलांचं खाते उघडायचं असेल तर त्याचं जन्म प्रमाणपत्र असणं गरजेचं अर्जासोबत जोडणं गरजेचं आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
PPF Account: वयाच्या 21 व्या वर्षी PPF अकाउंट उघडू शकता का? वाचा काय सांगतो नियम
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement