Success Story : गुलाबाच्या शेतीमध्ये घेतलं बोराचं आंतरपीक, उत्पन्न मिळणार लाखात, कशी केली शेती?

Last Updated:

चवीला गूळ आणि रंगाने हिरवट असणाऱ्या या झाडांची लागवड केली आहे. महत्त्वाचं म्हणजे रासायनिक खतांचा वापर न करता मेटकरी यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती केली आहे. 

+
गुलाबाच्या

गुलाबाच्या शेतामध्ये बोरांचा घेतला आंतरपीक, खर्च बाजार करून उत्पन्न मिळणार दोन ल

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील अनवली गावात राहणाऱ्या अनंत मेटकरी यांनी गुलाबांच्या फुलांमध्ये आंतरपीक घेत बॉल सुंदरी या बोरांच्या झाडांची लागवड केली आहे. चवीला गूळ आणि रंगाने हिरवट असणाऱ्या या झाडांची लागवड केली आहे. महत्त्वाचं म्हणजे रासायनिक खतांचा वापर न करता मेटकरी यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती केली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील अनवली गावात राहणाऱ्या अमोल मेटकरी यांनी अर्ध्या एकरामध्ये गुलाबांची लागवड केली. गुलाबांची रोपे लागवड करत असताना त्यांनी आंतरपीक घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये बॉल सुंदरी या बोरांची झाडांची लागवड केली. शेतीची मशागत करून बारा बाय आठ वर या बॉल सुंदरी बोरांच्या झाडांची लागवड मेटकरी यांनी केली आहे.
advertisement
या बोरांची मागणी मुंबई, पुणे या ठिकाणी असून बाजारात 50 ते 60 रुपये किलो दराने या बोरांची विक्री होत आहे. अर्ध्या एकरामध्ये जवळपास 250 पेक्षा जास्त रोपांची लागवड अनंत मेटकरी यांनी केली आहे. तर बॉल सुंदरी या बोरांच्या झाडांची लागवड करण्यासाठी अर्ध्या एकरासाठी अनंत मेटकरी यांना 50 हजार रुपयांपर्यंतचा खर्च आला आहे. तर बोरांच्या विक्रीतून त्यांना जवळपास 2 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळणार असल्याची माहिती मेटकरी यांनी दिली.
advertisement
अनंत मेटकरी हे पारंपरिक पिके न घेता शेतीमध्ये विविध प्रयोग करत शेती करत असतात. त्यांनी केलेली शेती पाहण्यासाठी सोलापूर जिल्ह्यासह, सांगली, लातूर, धाराशिव आणि इतर जिल्ह्यातून शेतकरी अनंत मेटकरी यांच्या शेतात भेट देण्यासाठी येत असतात. गुलाबांच्या फुलातून मिळालेल्या उत्पन्नातूनच अनंत मेटकरी यांनी या बॉल सुंदरी या बोरांच्या झाडांची लागवड केली आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांकडे लक्ष न देता शेतीमध्ये विविध प्रयोग करत शेती केल्यास भरघोस उत्पन्न मिळेल, असा सल्ला प्रयोगशील शेतकरी अनंत मेटकरी यांनी दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : गुलाबाच्या शेतीमध्ये घेतलं बोराचं आंतरपीक, उत्पन्न मिळणार लाखात, कशी केली शेती?
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement