ITR फाइल करण्यासाठी 15 सप्टेंबर शेवटची तारीख आहे. अवघे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. याआधी सरकारने 31 ऑगस्टची डेडलाईन वाढवून 15 सप्टेंबर केली आहे. आता मुदतवाढ मिळणं जरा कठीणच आहे. मात्र आता चिंता करु नका. मोबाईलवर कुठेही तुम्ही आयटीआर फाइल करू शकता. आयटीआर 2025-26 वर्षासाठी तुम्ही हे करू शकता.
आयटीआर फोनवर भरणाऱ्यांसाठी दोन मोबाईल अॅप लाँच करण्यात आले आहेत. AIS for Taxpayer आणि Income Tax Department ने हे दोन्ही अॅप अॅन्ड्रॉइड आणि iOS युजर्ससाठी आणले आहेत. यासाठी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीनं आयकरचं अॅप डाऊनलोड करायचं आहे. त्यानंतर काय प्रोसेस करायची जाणून घेऊया.
advertisement
स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया
सर्व कागदपत्रे गोळा करा. सर्वात आधी तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील. यामध्ये फॉर्म १६, फॉर्म २६एएस आणि अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट (AIS) (हे आयकर पोर्टलवरून डाउनलोड करता येते), बँक स्टेटमेंट, गुंतवणुकीचे पुरावे (LIC, ELSS, PPF, इत्यादी) आणि इतर उत्पन्नाचे तपशील (उदा. भाडे किंवा एफडीवरील व्याज) यांचा समावेश होतो.
Post Office च्या 'या' स्किममध्ये दरमहा मिळेल ₹5550चं फिक्स व्याज! चेक करा डिटेल्स
लॉगिन करा आणि ॲप सुरू करा. तुमचा पॅन, आधार किंवा नोंदणीकृत युजर आयडी आणि पासवर्ड वापरून आयकर विभागाच्या ॲपवर लॉगइन करा. यासाठी आधार ओटीपीसारख्या मल्टी-फॅक्टर सिक्युरिटीची पडताळणी आवश्यक आहे.
आधीच भरलेला डेटा तपासून घ्या. ॲपवर तुमचा अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट आणि टॅक्सपेयर इन्फॉर्मेशन समरीआधीच उपलब्ध असते, ज्यात बँक, नोकरी देणारी संस्था किंवा म्युच्युअल फंड कंपन्यांनी दिलेला डेटा असतो. हा डेटा तपासा आणि खात्री करा.
योग्य फॉर्म निवडा, तुमचे उत्पन्नाचे स्रोत उदा. पगार, पेन्शन, भांडवली नफा किंवा इतर उत्पन्न यावर आधारित योग्य आयटीआर फॉर्म निवडा. ॲप तुम्हाला यासाठी योग्य मार्गदर्शन करते. माहितीमध्ये बदल करा किंवा जास्तीची माहिती अपडेट करा. जर काही माहिती चुकीची असेल किंवा राहिली असेल उदा. एफडीचे व्याज किंवा भाड्याचे उत्पन्न तर ती तुम्ही एडिट करु शकता किंवा अॅड करु शकता.
तुमचं Income शून्य असो किंवा अडीच लाख, या 5 लोकांना भरावाच लागतो ITR, नाहीतर येते Notice
ई-व्हेरिफिकेशन आणि सबमिशन ही प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे. संपूर्ण भरलेला फॉर्म आधी तपासून घ्या. एकदा तुमचा रिटर्न पूर्ण झाल्यावर, आधार ओटीपी, नेट बँकिंग किंवा डिजिटल सिग्नेचर त्याचे ई-व्हेरिफिकेशन करा आणि सबमिट करा. सबमिट झाल्यावर तुम्हाला लगेच एक पोचपावती मिळेल.