तुमचं Income शून्य असो किंवा अडीच लाख, या 5 लोकांना भरावाच लागतो ITR, नाहीतर येते Notice
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
करंट अकाउंट, विदेश प्रवास, वीजबिल, TDS, विदेशी मालमत्ता असणाऱ्यांना ITR फाइल करणं बंधनकारक आहे. 15 सप्टेंबर शेवटची तारीख, नियम मोडल्यास नोटीस व दंड येऊ शकतो.
तुमचं उत्पन्न शून्य असो किंवा अडीच लाख नाहीतर त्यावर पण जर तुम्ही आयटीआर भरला नाही तर तुमची खैर नाही. याचं कारण म्हणजे असे 5 लोक आहेत ज्यांना कंपल्सरी आयटीआर भरणं बंधनकारक आहे. त्यांनी ITR फाइल नाही केला तर त्यांना 100 टक्के नोटीस येऊ शकते. काही विशिष्ट परिस्थितीमध्ये उत्पन्न कितीही असलं तरीसुद्धा आयटीआर फाइल करणं गरजेचं आहे. नाहीतर त्यावर मोठा दंड भरावा लागतो. नोटीस येऊ शकते. असे कोणते 5 लोक आहेत ज्यांना काहीही झालं तरी आयटीआर फाइल करावा लागतो? त्यामध्ये तुमचा नंबर तर नाही ना? सोप्या भाषेत समजून घ्या.
1. करंट अकाउंट असणारे
जर तुमच्याकडे किंवा तुमच्या घरात कोणाकडे करंट अकाउंट असेल तर त्यांना आयटीआर फाइल करावा लागतो. आर्थिक वर्षात 1 कोटीहून अधिक व्यवहार जमा केली असेल तर ITR फाइल करावा लागतो. डिजिटल व्यवहारांची नोंद इनकम टॅक्सकडे असल्याने तुम्हाला नोटीस येऊ शकते.
2. विदेश प्रवासावर २ लाखांपेक्षा जास्त खर्च
वैयक्तिक किंवा व्यावसायिक, कोणत्याही कारणासाठी परदेश प्रवासावर 2 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केला असेल, तरी रिटर्न दाखल करणं आवश्यक आहे. हा नियम ब्लॅक मनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वाचा आहे.
advertisement
3. वीजबिलावर एक लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च
एका वर्षात वीजबिलाचा खर्च 1 लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास देखील ITR भरणं अनिवार्य ठरतं. कारण उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असल्यास कर विभाग तपासणी करू शकतो.
4 TDS कापला जात असेल तर
तुमच्या उत्पन्नावर TDS 25 हजार रुपयांपेक्षा जास्त कापला गेला असेल तर रिटर्न दाखल करावा लागतो. मात्र, वरिष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा 50 हजार रुपये आहे. काही वेळा स्टार्टअप सारख्या कंपन्यांमध्ये TDS कापला जातो. तो मिळवण्यासाठी देखील ITR फाइल करणं गरजेचं आहे. अन्यथा पैसे मिळणार नाहीत.
advertisement
5. विदेशी मालमत्ता किंवा खाते
जर तुमच्या नावावर परदेशात मालमत्ता असेल किंवा विदेशी बँक खात्यावर साइनिंग अथॉरिटी असेल, तर ITR फाइल करणं बंधनकारक आहे. यावेळी सर्व तपशील देणं आवश्यक आहे.
आयकर नियमाप्रमाणे मर्यादेपेक्षा कमी उत्पन्न असलं तरी या पाच परिस्थितींमध्ये ITR दाखल करणं बंधनकारक आहे. असं केल्याने भविष्यात कर्ज, व्हिसा किंवा इतर आर्थिक सुविधांसाठी तुमचा रेकॉर्ड क्लीन राहील आणि अनावश्यक दंड भरावा लागणार नाही. याशिवाय तुम्हाला नोटीस देखील येणार नाही. त्यामुळे काळजी घ्या आणि तातडीनं ITR भरुन टाका, 15 सप्टेंबर शेवटची तारीख आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 11, 2025 2:38 PM IST
मराठी बातम्या/मनी/
तुमचं Income शून्य असो किंवा अडीच लाख, या 5 लोकांना भरावाच लागतो ITR, नाहीतर येते Notice