प्रीतेश याच्या वडिलांचे स्वप्न होते की आपल्या मुलाने चांगले शिक्षण घेऊन चांगला पगाराची नोकरी करावी. या करता प्रीतेश याने पुण्यामधील सिहगड कॉलेजला त्याचे बी. कॉम पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुण्यामधीलच एका खासगी कंपनीत प्रीतेश याने काम करण्यास सुरुवात केली. पण पगार हा 50 हजारापेक्षा कमी असल्यामुळे खर्च सुद्धा भगत नसल्याने प्रीतेश याने त्याच्या एका मित्रासोबत पुण्यातच अमृतुल्य सुरू केले. जेणेकरून एक साईड बिझनेस देखील करता येईल. हा व्यवसाय सुरू केल्यानंतर पूर्ण वेळ व्यवसायाला देण्याचा निर्णय त्याने घरी सांगितला. मध्यमवर्गीय कुटुंब असल्याने घरच्यांकडून सुरुवातीला विरोध होत असल्याचे प्रीतेश सांगत असतो.
advertisement
Home Business: धपाट्याचा स्टॉल लावला अन् सुचली बिझनेस आयडिया, आता महिलेची कमाई लाखात!
या व्यवसायातून प्रीतेश हा चांगली कमाई घेऊ लागला. यामुळे दुसऱ्यांच्या हाताखाली काम करण्याची त्याची इच्छा राहिली नाही. परंतु काही काळानंतर प्रीतेश याला त्याचा हा व्यवसाय काही कारणास्तव बंद करावा लागला. त्यातच कोरोना देखील आल्याने प्रीतेश हा पुन्हा आपल्या गावी जळगावला आला. या ठिकाणी देखील आपण आपला व्यवसाय सुरू करूया असा प्रश्न घरी मांडल्यानंतर वडिलांनी तुला ज्यात आवड आहे ते तू कर असे सांगितले. 3 वर्षापूर्वी त्याने भावसार आस्वाद कॉर्नर या नावाने साऊथ इंडियन नाश्ता सेंटर सुरू केले. आणि आज हा तरुण महिन्याला 1 लाखापर्यंतचे उत्पन्न या व्यवसायातून घेत असतो.
इतकेच नाही तर आज हा तरुण इतरांना देखील त्याच्या या व्यवसायाच्या माध्यमातून चांगला रोजगार देत आहे. स्वतः प्रीतेश हा सर्व पदार्थ हे ताजे बनवत असतो. यात त्याला त्याचा वडिलांची आणि आईची देखील मोठी मदत असल्याचे प्रीतेश बोलतो. याच्याकडे 30 रुपये प्लेट असे मेंदूवडा, क्रिस्पी मेंदूवडा, इडली, फ्राय इडली, खमंग असे पदार्थ मिळत असतात. तुम्हाला जर याच्याकडेच क्रिस्पी मेंदूवडे खाण्याचे जायचे असल्यास जळगाव येथील महाबळ परिसरात याचे हे नाश्ता सेंटर आहे.