कोल्हापूर: घरात मुलींना फळांचे सॉस, जॅम, पल्प आवडायचे. पण, बाजारातील हे पदार्थ केमिकल युक्त असल्याने कोल्हापूरकर गृहिणीने हे पदार्थ घरीच बनवायला सुरुवात केली. विशेष म्हणजे मुलींसाठी सुरुवात केलेल्या या पदार्थांतून फळ प्रक्रिया उद्योग सुरू झाला आणि आता तो कोल्हापुरातील नामवंत ब्रँड झाला आहे. विशेष म्हणजे या व्यवसायातून कोल्हापूरकर मीनल भोसले या वर्षाकाळी 20 ते 25 लाख रुपयांची कमाई करत आहेत. याच व्यवसायाबाबत त्यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिलीये.
advertisement
फळप्रक्रिया उद्योगाबाबत आजही हवी तशी जागरूकता झालेली दिसत नाही. पण हंगामातील फळांच्या उपलब्धतेनुसार घरगुती रूपात फळांवर प्रक्रिया उद्योग केला तर नक्कीच चांगले उत्पादन मिळवता येते. कोल्हापुरातील मीनल भोसले हे गेल्या अनेक वर्षांपासून फळ प्रक्रिया उद्योगात मोठ्या प्रमाणात नफा मिळवत आहे. हंगामानुसार उपलब्ध झालेल्या फळांवर प्रक्रिया करून ते स्वतः विक्री करतात. त्यासोबतच ज्यांना प्रक्रिया करून हवी आहे त्यांना मजुरी आकारून आंबा पल्प, टोमॅटो सॉस, चिंच सॉस त्यांच्यामार्फत केला जातो. छोट्या स्वरूपात सुरू केलेल्या या व्यवसायाला आज मोठ रूप मिळालेल आहे.
कोल्हापूरमधली एकमेव 'Baby Milk Bank', नवजात बाळांना मिळतं आईचं दूध!
कशी झाली सुरुवात?
मीनल भोसले यांची सुरुवात खरंतर त्यांच्या मुलींच्या मुळे झाली. त्यांच्या दोन्ही मुलींना सॉस, जॅम, पल्प मोठ्या प्रमाणात आवडायचे. त्यामुळे मुलींना आवडणारे हे पदार्थ आपण घरीच बनवून खाऊ घालायचे, या उद्देशाने त्यांनी हे पदार्थ बनवायला सुरू केली. कोल्हापुरातील आर के नगर परिसरात राहणाऱ्या या भोसले दाम्पत्याने ‘पियुष’ या नावाने हा उद्योग सुरू केला. त्यात मीनल भोसले यांच्या वडिलांचा मोठा वाटा असल्याचं ते सांगतात.
कोल्हापुरात वाढला व्यवसाय
मीनल यांचे पती प्रतापराव भोसले हे एसटी विभागामध्ये होते. त्यामुळे ते पुण्यात राहत असत. तेथेच त्यांना या प्रक्रिया उद्योगाबद्दल माहिती मिळाली. त्यातूनच त्यांना या फळ प्रक्रिया उद्योगाची गोडी लागली. त्यांनी यासाठी आवश्यक असणारे कोर्सेस देखील केले. त्यानंतर त्यांनी हळूहळू या बिझनेसची उभारणी सुरू केली. सुरुवातीला त्यांनी घरी मुलींना नातेवाईकांना केलेले पदार्थ खाऊ घातले. हे पदार्थ त्यांना देखील रुचकर वाटू लागले. त्यानंतर त्या कोल्हापुरात आल्या. कोल्हापुरात या व्यवसायाची अगदी मोठ्या प्रमाणात वाढ झाली.
डॉक्टरसाहेब लयभारी! वैद्यकीय सेवेसोबत जपतायत सामाजिक बांधिलकी, पाहा Video
कोल्हापुरात आल्यानंतर स्वयंसिद्धा या संस्थेचे पाठबळ मिळालं. याचा उपयोग त्यांना सातत्याने झाला. अगदी कमी भांडवलामध्ये आणि घरच्या घरी त्यांचा हा व्यवसाय आज सुरू आहे. त्यांच्या या व्यवसायाची दखल कोल्हापुरातील वेगवेगळ्या उद्योजक घडवणाऱ्या तसेच सामाजिक संस्थांनी घेत त्यांना पुरस्कारांनी सन्मानित देखील केलं.
थेट शेतकऱ्यांकडून कच्चा माल खरेदी
एखाद्या व्यवसायासाठी आणि त्यात जर हा उद्योग शेतीशी निगडित असेल तर त्यांना कच्च्या मालाची उपलब्धता कशी होईल हा प्रश्न निर्माण झालेला असतो. मात्र मीनल भोसले या थेट शेतकऱ्यांच्या बांधावरूनच व्यवसायासाठी लागणारे फळे शेतकऱ्यांकडून घेतात. तसेच कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने हा कच्चामाल त्यांना उपलब्ध होतो. त्याचबरोबर आता शेतकऱ्यांना या उद्योगाची माहिती झाल्यामुळे बहुतांश शेतकरी हे त्यांना घरपोच माल देतात.
6 राज्यांतून मागणी
बहुतांश नागरिकांना हा फळ प्रक्रिया उद्योग म्हणजे जास्त भांडवलीचं उद्योग असल्याचं वाटतं. मात्र हा उद्योग अगदी कमी भांडवलामध्ये देखील करू शकतो हे भोसले दाम्पत्यांनी सिद्ध करून दाखवलय. आतापर्यंत भोसले दाम्पत्यांनी जवळपास वर्षाकाठी 20 ते 25 लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. सध्या पियुष नावाने सुरू केलेल्या या व्यवसायाला मोठं रूप मिळाल आहे. साधारण 6 राज्यांमध्ये त्यांनी बनवलेल्या या उत्पादनांना मागणी आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात भाजी आणि फळांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. मात्र काही वेळा फळांचे दर घसरले की फळांचं काय करायचं? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहतो. त्यांना उत्पादन खर्चही योग्य प्रमाणात मिळत नाही. अशावेळी फळ प्रक्रिया उद्योगाची जोड दिली तर त्यांना चांगला नफा मिळू शकतो, असेही मीनल सांगतात.